जकार्ता : इंडोनेशियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. इंडोनेशियातील बाली बेटाकडे जात असणारी एक बोट उलटल्याने समुद्रात बुडाली आहे. ही बोट ६५ प्रवाशांना घेऊन जात होती. यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर २९ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अजूनही ३२ जण बेपत्ता आहेत. सध्या बचाव कार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केएमपी तुनु प्रतमा जया हे जहाज पूर्व जावातील केतापांग बंदरातून बालीच्या गिलिमानुक बंदराकडे रवाना झाले होते. जहाज गिलिमानुकला रवाना झाल्यानंतर अर्ध्या तासाने समुद्रात उलटे झाले आणि बुडाले. या जहाजावर सुमारे ५३ प्रवासी आणि १२ क्रू मेंमहर्स होते, तसेच ट्रम्प सारखी अनेक मोठी वाहने देखील जहाजावर होती. स्थानिक पोलिसांनी सध्या बचावकार्य सुरु केले आहे. अद्याप जहाज बुडण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आले आहे. बेपत्ता लोकांचे शोधकार्यही सुरु आहे. सध्या या घटनेने इंडोनेशियात मोठी खळबळ उडाली आहे.
शोधकार्य करणाऱ्या सुराबाय संस्थेने गुरुवारी (३ जुलै) एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात सांगण्यात आले आहे की, बुधवारी २ जुलै रोजी रात्री ११.२० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. टगबोट्स आणि फुगवता जहाजांसह नऊ बटाव बोटी बेपत्ता लोकांचा सध्या शोध घेत आहे. सध्या समुद्रात लांटाचा प्रवाह अधिक आहे. यामुळे बचाव पथकाला लोकांना शोधण्यास अडथळ निर्माण होत आहे. राष्ट्रीय शोध एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता लोकांचा तापस लागेपर्यंत हा प्रयत्न सुरुच राहिले असे म्हटले आहे.
यापूर्वी देखील जानेवारी महिन्यात जहाज बुडाल्याची दुर्घटना घडली होती. ३ जानेवारी २०२५ रोजी एक जहाज इंडोनेशियाच्या सामुद्रधुनीत बुडाल्याने ८ जणांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियाच्या मालुकु येथे ही दुर्घटना घडली होती. एक स्पीडबोट समुद्रातमध्ये अचानक पलटी झाली होती. ही बोट सेपम भागियां बारात येथून आंबोनकडे रवाना झाली होती. यावेळी समुद्रात तंरणाऱ्या एका लाकडाला बोट आदळली. यामुळे बोटीचे आवरण तुटले आणि बोट समुद्राक बुडाली. या बोटीवर ३० प्रवासी होती. यातील ८ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण गंभर जखमी झाले होते.