पुतिन यांच्या बैठकीत जबरदस्तीने प्रवेश, रशियन राष्ट्राध्यक्षांनी केले दुर्लक्ष, पाकिस्तानी पंतप्रधानांच्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य काय? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Shehbaz Sharif Putin Erdogan Video : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा एका सोशल मीडिया व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) चर्चेत आले आहेत. हा व्हिडिओ तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय ट्रस्ट पीस फोरम’ (International Trust Peace Forum) दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला की, शरीफ यांनी सुमारे ४० मिनिटे वाट पाहिल्यानंतर, ते आणि त्यांचे शिष्टमंडळ त्या खोलीत जातात, जिथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान (Recep Tayyip Erdogan) यांची बंद दाराआड (Closed-door) बैठक सुरू होती. पुतिन यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि नंतर शाहबाज शरीफ तेथून निघून गेले, असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. हा व्हिडिओ सर्वप्रथम रशियन मीडिया चॅनल आरटी इंडियाने (RT India) शेअर केला होता, ज्यामुळे तो वेगाने पसरला. या दाव्यात पुढे म्हटले गेले की, शरीफ यांनी उशिरा सुरू झाल्यामुळे पुतिन-एर्दोगान यांची बैठक रद्द (Canceled) केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Medical Warning : COVID लस ठरली प्राणघातक! FDA लावणार ‘Black Box’ची वॉर्निंग; करोडो तरुणांनी ‘यामुळे’ गमावले प्राण
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमागे असलेले सत्य काही वेगळेच आहे. व्हिडिओने घटनेचे चुकीचे वर्णन (Misdescription) केले आहे, असे अनेक तथ्य तपासणी अहवालांमध्ये (Fact Checks) समोर आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आरटी इंडियाने नंतर हा व्हिडिओ आणि त्यासंबंधीची पोस्ट हटवली (Deleted) आणि एक निवेदन जारी केले की, त्यांच्या पोस्टमुळे घटनांचे चुकीचे वर्णन होण्याची शक्यता आहे. यावरून स्पष्ट होते की, शाहबाज शरीफ यांनी बंदिस्त बैठकीत जबरदस्तीने प्रवेश केला होता, याला अधिकृत पुष्टी (Official Confirmation) नाही.
🇷🇺🇵🇰 UTTER HUMILIATION: While Putin travelled to India just days ago to expand India-Russia trade and strengthen friendship, Putin at an international forum in Turkmenistan kept Pakistani PM Sharif waiting for over FORTY minutes. Sharif then lost patience, gatecrashed the… pic.twitter.com/uskFmOGOCP — Paul Antonopoulos 🇬🇷🇨🇾 (@oulosP) December 12, 2025
credit : social media and Twitter
या घटनेची पुष्टी करणारे रशियन किंवा पाकिस्तानी सरकारकडून कोणतेही अधिकृत विधान (Official Statement) आलेले नाही. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, शाहबाज शरीफ यांनी पुतिन आणि एर्दोगान या दोघांशीही द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर (Bilateral and Regional Issues) चर्चा केली. त्यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचीही भेट घेतली होती. म्हणून, ‘जबरदस्तीने प्रवेश’ करण्याचा व्हायरल दावा खोटा (False) ठरला आहे आणि तो केवळ गैरसमज (Misunderstanding) किंवा चुकीचे प्रतिनिधित्व (Misrepresentation) मानले जात आहे, ज्यातून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्सची निर्मिती झाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIRAL: ‘सेक्स टॉय ते काँडोम..’ Epstein Files फोटोंनी जगभरात आश्चर्याचा स्फोट; अमेरिकेत ट्रम्पसोबत सर्वच दिग्गज वादाच्या भोवऱ्यात
हा संपूर्ण घटनाक्रम तुर्कमेनिस्तानच्या राजधानी अश्गाबात येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय ट्रस्ट पीस फोरम’ दरम्यान घडला होता. हा मंच आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्षाला (International Year of Peace and Trust) समर्पित होता. या मंचाचे प्राथमिक उद्दिष्ट देशांमधील तणाव कमी करणे (Reducing Tension), संवाद वाढवणे (Promoting Dialogue) आणि लोकांमध्ये सलोखा (Harmony) निर्माण करणे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २०२५ हे आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष म्हणून घोषित केले होते आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अनेक देशांचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उच्चस्तरीय प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाच्या गंभीर वातावरणात घडलेल्या या व्हिडिओमुळे पाकिस्तानी पंतप्रधानांना नाहक वादाला तोंड द्यावे लागले.
Ans: व्लादिमीर पुतिन (रशिया) आणि रेसेप तय्यिप एर्दोगान (तुर्की).
Ans: तुर्कमेनिस्तान (राजधानी अश्गाबात) येथे.
Ans: व्हिडिओने घटनेचे चुकीचे वर्णन केले आणि दावा खोटा ठरला.






