Anmol Bishnoi Arrest : गँगस्टर अनमोल बिश्नोई लवकरच दिल्लीत; NIA ने आवळल्या मुसक्या
दिल्ली विमानतळावर NIA करणार अटक
कायदेशीर प्रक्रियेनुसा, अनमोल बिश्नोई (Anmol Bishnoi) दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याला राष्ट्रीय तापस संस्था (NIA) च्या ताब्यात दिले जाईल. यानंतर त्याला पटियाला हाउस कोर्टात हजर केले जाणार आहे. यानंतर न्याालयाच्या आदेशानुसार त्याला कोठडी, चौकशी आणि पुढील प्रक्रियेसाठी नेले जाईल.
अनमोलवर अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये सामील असल्याचे आरोप आहेत. त्याच्या बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा, तसेच सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दीकीच्या हत्याकांडाचा देखील आरोप आहे. याशिवाय इतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
अनमोलला भारतात आणल्यानंतर कोणत्या कस्टडीमध्ये ठेवायचे याचा निर्णय केंद्र सरकारद्वारे घेतला जाणार आहे. महाराष्ट्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकणाअंतर्गत मुंबई पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी अर्ज करणार आहेत. त्याच्यावर देशाच्या अनेक राज्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अनमोल फेब्रुवारी २०२५ मध्ये अमेरिकेने ताब्यात घेतले होते. तो अमेरिकेतून भारतात गुन्हेगारीच्या कारवाया करत होता. अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने त्याला बेकयादेशीरपणे अमेरिकेत राहण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर १८ नोव्हेंबर रोजी त्याला हद्दपार करण्यात आले. याची माहिती बाबा सिद्दीकी पुत्र झीशान सिद्दीकी याने दिली. यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने तातडीने त्याच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु केली.
भारत तपास संस्थान NIA च्या आणि मुंबई पोलिसांच्या मोस्ट वान्टेड यादीत अनमोल बिश्नोईचे नाव सामील आहे. NIA ने त्याच्यावर १० लाखांचे बक्षीसही ठेवले होते. अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) सखा भाऊ आहे. बिश्वोई गँगचा अनेक आपरेशन्स नियोजन व व ते पूर्ण करणे अनमोल करत होता.
Emiway Bantai च्या जीवाला धोका; रॅपरला मिळाली जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित प्रकरण?
Ans: गॅंगस्टर अनमोल बिश्नोईला आज बुधवार (दि. १९ नोव्हेंबर) भारतात आणले जाणार आहे. लवकरच तो दिल्लीत पोहोचेल.
Ans: गँगस्टर अनमोल बिश्नोई दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याला NIA च्या ताब्यात दिले जाणार आहे. यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाऊल. नंतर न्यालयाच्या आदेशानुसार त्याची चौकशी आणि पुढील प्रक्रिया होई. त्याच्या कोणत्या कस्टडीत ठेवायचे याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे.
Ans: अनमोल बिश्नोईवर, सिद्धू मूसेवाला, बाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचे आरोप आहे. तसेच अनेक इतर अने गंभीर गुन्ह्यांचे आरोप देखील दाखल आहेत.
Ans: अनमोल बिश्नोईवर NIA ने १० लाखांचे बक्षीस ठेवले होते.






