पॅलेस्टानईला पाठिंबा देणं भोवलं! Greta Thunberg वर ब्रिटनमध्ये दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
केस ओढले, फरपटत नेलं अन्…. ; इस्रायली कोठडीत स्वीडिश कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गसोबत गैरवर्तन
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२३ डिसेंबर २०२५) ग्रेटाला अटक ब्रिटनची राजधानी लंडन येथे ब्रिटनच्या दहशतवादी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. लंडनमध्ये पॅलेस्टाईन ॲक्शन संघटनेच्या समर्थनार्थ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होेते. या आंदोलनावेळी ग्रेटाला अटक करण्यात आली. मात्र यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून अभिव्यक्ती स्वातंत्र, आंदोलनाचा अधिकार आणि दहशतवादी कायद्याचा गैरवापर यावर सर्व चर्चा सुरु आहे.
मंगळवारी पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनाता ग्रेटा I Support the Palestine Action Prisoners असा फलक घेऊन ती आंदोलनात सहभागी झाली होेती. ब्रिटिश सरकारने पॅलेस्टाईन ॲक्शन या संघटनेवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप केला आहे. यामुळे ग्रेटा थनबर्गला या संघटनेला पाठिंबा देणे महागात पडले आहे. या संघटनेवर ब्रिटनमध्ये बंदी देखील घालण्यात आली होती.
ब्रिटनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटा थनबर्गला टेररिझम ॲक्ट २००० मधील कलम १३ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. हे कलम बंदी घातलेल्या संघटनांच्या समर्थनाशी संबंधित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या मते, देशात बंदी घातलेल्या संघटनांना समर्थन करणे, अशा प्रकारचे पोस्टर्स प्रदर्शित करणे हा कायद्याचा भंग आहे. यामुळे ग्रेटाला कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटासह आणकी दोन कार्यकर्त्यांना देखील अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पॅलेस्टाईन ॲक्शन संघटनेने हे आंदोलन एस्पेन इन्शुरन्स या कंपनीच्या कार्यालयाबाहेर आयोजित केले होते. या कंपनींवर इस्रायली शस्त्रनिर्मित कंपनी एल्बिट सिस्टिम्सला विमा संरक्षण पुरवल्याचा आरोप करम्यात आला होता. यावेळी आंदोलनादरम्यान लाल रंग फेकण्यात आला होता. इस्रायल-हमास युद्धा (Isreal Hamas War) चे प्रतीक म्हणून हा रंग वापरला जातो.
ब्रिटनमधील अटकेपूर्वी ग्रेटाला थनबर्गला इस्रायलने देखील अटक केली होती. गाझाकडे मदत घेऊन निघालेल्या ग्लोबल फ्लोटिलाला इस्रायलने अडवले होते. यावेळी या बोटीत ग्रेटा थनबर्गही होती. या बोटीवर १३७ कार्यकर्त्ये होते. या सर्वांना ताब्यात घेतल्यानंतर मोठा वाद सुरु झाला होता. तसेच ग्रेटासोबत इस्रायली सैन्याने ग्रेटाला क्रूर आणि भयावह वागणूक दिल्याचा आरोपही करण्यात आला होता.
युनूस सरकारचा दुटप्पी चेहरा! एकीकडे व्हिसा सेवा स्थगित, तर दुसरीकडे भारताशी मैत्रीचे सुरु
Ans: ग्रेटा थनबर्गला लंडनमध्ये अटक करण्यात आली असून तिच्यावर पॅलेस्टाईन ॲक्शन या संघटनेच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभाग घेतल्याने अटक करण्यात आली आहे.
Ans: ग्रेटाला थनबर्गला टेररिझम ॲक्ट २००० मधील कलम १३ कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.






