शेकडो अमेरिकन विद्यार्थ्यांना आले सेल्फ डिपोर्टचे आदेश; F-1 व्हिसा करण्यात आले रद्द, नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया )
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातून अवैध स्थलांतरितांना हाकलून लावण्यासाठी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच आदेश जारी केले . यानंतर त्वरित अवैध नागरिकांवर कारवाई करण्यात आली. याअंतर्गत अनेक विद्यार्थ्यांवरही कारवाई होत आहे. दरम्यान अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागाकडून शेकडो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एक धक्कादायक इ-मेल पाठवण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना ‘सेल्फ-डिपोर्ट म्हणजेच स्व-निर्वासनाचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई विशेष करुन कॅम्पसमधील देशविरोधी किंवा संस्थाविरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर करण्यात आले आहे. केवळ निषेधांमध्येच सहभागी झालेले नव्हे तर सोशल मीडियावहर राजकीय पोस्ट करणाऱ्या लाईक करणाऱ्या किंवा त्यावर टीका करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही कारवाई केली जात आहे. या विद्यार्थ्यांचा F-1 व्हिसा रद्द करण्यात आला आहे.
F-1 व्हिसा हा एक नॉन-इमिग्रंट (अस्थायी) व्हिसा आहे. हा व्हिसा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येतो. या व्हिसासाठी विद्यार्थ्यांना मान्यता प्राप्त संस्थेत पूर्णवेळ शिक्षण घ्यावे लागते. विद्यार्थ्यांकडे शिक्षम व खर्च भागवण्यासाठी पुरेसे आर्थिक संसाधने असावी लागतात.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे मंत्री मार्को रुबियो यांनी अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्याचे आदेश दिले आहे. मार्क रुबियो यांनी म्हटले आहे की, काही विद्यार्थ्यांनी अमेरिकेतली विविध राजकीय घडामोडींवर सोशल मीडियावर टीका केली होती, यामध्ये पोस्ट शेअर करणे, लाईक करणे किंवा टीप्पणी करण अशा प्रकरणांमध्ये या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी विरोधी आंदोलनांमध्ये सहभाग घेतला होता. अमेरिकेच्या सरकारने याला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर म्हटले आहे. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येते आहे.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या ई-मेलमध्ये परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे की, F-1 व्हिसा अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि नॅशनॅलिटी कायद्याच्या कलम 221 (i) अंतर्गत करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सुचित करण्यात आले आहे की, त्यांनी स्वत:हून वेळेत देश सोडला नाही, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यांना ताब्यात घेऊन जबरदस्तीने देशाबाहेर पाठवले जाईल.
अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर या ई-मेलनंतर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी केवळ राजकीय मीम्स किंवा पोस्ट शेअर केल्या आहेत, यामुळे याचा परिणाम व्हिसा रद्द करणे का? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.हा निर्णय कठोर असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
अमेरिका आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे एक मोठे केंद्र आहे. मात्र, अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या या कारवाईमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.