भारत-इस्रायल LORA करार: पाकिस्तानची चिंता वाढली, भारतीय हवाई दलाच्या ताकदीत मोठी भर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India–Israel LORA deal : भारत आणि इस्रायल यांच्यातील संरक्षण सहकार्याला आणखी एक नवे परिमाण मिळण्याची शक्यता आहे. भारत सरकार लवकरच इस्रायलसोबत LORA (Long Range Artillery) क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसंदर्भात महत्त्वपूर्ण करार करू शकते, असा दावा एका आंतरराष्ट्रीय संरक्षण अहवालात करण्यात आला आहे. या करारामुळे भारतीय हवाई दलाची दीर्घ पल्ल्याच्या लक्ष्यांवर अचूक आणि जलद हल्ला करण्याची क्षमता लक्षणीय वाढणार आहे, ज्यामुळे पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांची झोप उडाली आहे.
LORA हे Israel Aerospace Industries (IAI) या आघाडीच्या संरक्षण कंपनीने विकसित केलेले प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. यामध्ये 400 किलोमीटरची मारक क्षमता आहे आणि ते हवेतून, जमीनवरून किंवा समुद्रातून डागता येते. या क्षेपणास्त्रात GPS आधारित मार्गदर्शन प्रणाली, अँटी-जॅमिंग तंत्रज्ञान, आणि दुर्गम भागात लक्ष्य भेदण्यासाठी सुसज्ज वॉरहेड देण्यात आले आहे. त्यामुळे कोणतेही लक्ष्य अत्यंत अचूकतेने आणि वेगाने उद्ध्वस्त करण्याची क्षमता यामध्ये आहे.
अहवालानुसार, भारत हे LORA क्षेपणास्त्र ‘Air-Launched’ स्वरूपात आपल्या हवाई दलात समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या ‘डिप स्ट्राइक’ क्षमतेत मोठा वाढ होणार असून, कोणत्याही आकस्मिक किंवा नियोजित युद्ध परिस्थितीत शत्रूच्या संरचना, रडार केंद्रे, आणि कमांड पोस्ट लक्ष्य करण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. LORA चा सामावेश केल्यास, भारताच्या लष्करी धोरणात ‘सर्जिकल स्ट्राइक’ आणि ‘प्रोऍक्टिव्ह रेस्पॉन्स’ यांसारख्या संकल्पनांना अधिक ताकद मिळणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्याचे भारतावर प्रेम… ! हाफिज सईदच्या प्रत्यार्पणावरून पाकिस्तानात वादळ; भुट्टोंच्या विधानावर पेटलं राजकारण
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीय लष्कर आणि हवाई दलाने त्या सर्व हल्ल्यांना यशस्वीपणे परतवले. त्या पार्श्वभूमीवर भारत आता आपल्या हवाई क्षमतेमध्ये अधिक सुधारणा करत आहे. LORA क्षेपणास्त्राच्या खरेदीमुळे पाकिस्तानला थेट धोका वाटू लागला आहे. 400 किमीच्या रेंजमुळे पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या लष्करी आणि औद्योगिक ठिकाणे आता भारतीय क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येणार आहेत.
भारत आणि इस्रायल यांच्यातील सैन्य सहकार्य दिवसेंदिवस बळकट होत आहे. याआधीही इस्रायलकडून भारताने हेरगिरी उपकरणे, अडव्हान्स ड्रोन्स, आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे. LORA क्षेपणास्त्र करार ही त्या संबंधांचीच पुढची पायरी मानली जात आहे. इस्रायलचे LORA क्षेपणास्त्र अनेक आंतरराष्ट्रीय चाचण्यांमध्ये यशस्वी ठरले आहे, आणि त्याच्या अचूकतेमुळे हे प्रणाली जगातील सर्वोत्कृष्ट बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपैकी एक मानली जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Elon Musk America Party : नवा पक्ष, नवा वाद! अमेरिकन राजकारणात ‘एलोन मस्क विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प’ महासंग्राम
LORA सारख्या प्रगत क्षेपणास्त्र प्रणालीचा भारतीय हवाई दलात समावेश झाल्यास, भारताची सामरिक क्षमता ‘हिट फर्स्ट, हिट हार्ड’ या धोरणानुसार अधिक सक्षम होईल. पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही शत्रूराष्ट्राने भारताच्या सीमेलगत कारवाया करण्याआधी आता अनेक वेळा विचार करावा लागेल. या निर्णयामुळे भारत ‘स्मार्ट आणि स्वावलंबी संरक्षण व्यवस्था’ घडविण्याकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे, जे भविष्यातील युद्धांमध्ये निर्णायक ठरू शकते.