भारत - पाकिस्तान युद्धाची सद्यस्थिती (फोटो सौजन्य - मुंबई प्रेस क्लब)
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर झालेली शस्त्रसंधी हा केवळ एक स्वल्पविराम असून तो कधीही संपू शकतो आणि मला भीती आहे की ही युद्धबंदी पाकिस्तानकडूनच पहिले तोडली जाईल’ अशी शक्यता आज डिफेन्स अॅनालिस्ट प्रवीण साहनी यांनी व्यक्त केली आहे. द मुंबई प्रेस क्लब आयोजित साऊथ एशिया इन फ्लक्स : डिकोडिंग द न्यू जिओपॉलिटिकल ऑर्डर व्याख्यानात प्रवीण साहनी यांनी दक्षिण आशियामध्ये बदलत्या भू-राजकीय परिस्थिती आणि त्यात भारताची भूमिका याबाबत विश्लेषणात्मक भाष्य केले.
याबाबत पुढे बोलताना त्यांनी आपले स्पष्ट मत मांडत सांगितले की ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताने ज्या लष्करी कारवाई केल्या आहेत त्यामध्ये त्याच्या मर्यादा उघड झाल्या आहेत आणि यामुळेच पाकिस्तान नक्कीच युद्धाची तयारी करत असल्याचा कयास त्यांनी यावेळी मांडला.
Israel Iran war : इराण-इस्त्रायल युद्धाचा भडका; जागतिक एअर ट्राफिक परिणाम, भारताची विमानसेवा कोलमडली
भारत युद्धाच्या उंबरठ्यावर
भारत देश हा युद्धाच्या उंबरठ्यावर असून मी केलेल्या अभ्यासानुसार आणि अंदाजानुसार, आपल्या देशावर पाकिस्तानकडून वर्षभरात पुन्हा हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता प्रवीण साहनी यांनी यावेळी वर्तवली आहे. इतकंच नाही तर भारताचा खरा शत्रू हा पाकिस्तान हा नसून त्याला पाठिंबा देत असलेला चीन आहे, आणि हे भारतातील लष्कराने आणि सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे असेही त्यांनी मत मांडले आहे. या गोष्टीमुळे भारताने आपल्या परराष्ट्र धोरणात आमुलाग्र बदल न केल्यास मोठ्या संकटात सापडू शकतो, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचे दिसून आले.
रशिया, चीन आणि अमेरिकेची महासत्ता
सध्या जगात अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच महासत्ता आहेत आणि आपल्या प्रभावाच्या बळावरच जगावर या तिन्ही देशांना राज्य करायचे आहे हे दिसून येत आहे. व्यापारी बळावर चीन आणि रशिया अधिकाधिक देशांना आपल्या बाजूला वळवत आहेत तर तिघांचेही लक्ष्य दक्षिण आशिया असल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट मत प्रवीण साहनी आपल्या अभ्यासातून मांडले.
याशिवाय या सगळ्यामध्ये भारत नक्की काय करणार आहे आणि काय करत आहे याकडे आता लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. ८० टक्के देश हा महासत्तेकडे आकर्षित होत असून भारताची भूमिका ही संभ्रमाची असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे म्हटले.
भारताने स्वतःला बळकट करावे
भारताने झपाट्याने अर्थात लवकरात लवकर आपले लष्कराची संख्या कमी करुन वायूसेनेवर भर देण्याची आवश्यकता आहे. कारण, दुसऱ्या बाजूने पाकिस्तान देश हा चीनच्या मदतीने युद्धासाठी तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. तर ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधानांनी हा फक्त स्वल्पविराम असून भविष्यातही कारवाई सुरु राहील असे स्पष्ट केले होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पण आपल्या अभ्यासानुसार, हा स्वल्पविराम पाकिस्तानकडून उठविण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं. त्यामुळे आपण युद्धाच्या उंबरठ्यावर असून त्यासाठी आपल्या परराष्ट्र धोरणात आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता साहनी यांनी व्यक्त केली. पहलगाम हल्ल्यानंतर तर चीनने पाकिस्तानच्या संरक्षणाची थेट हमीच देणे भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, असेही साहनी यांनी अधोरेखित केले.
या व्याख्यानाला राज्यसभा खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर, काँग्रेस नेते विश्वास उटगी आदी उपस्थित होते.