भारत आणि तैवानच्या संबंधाला नवी दिशा; EXPO 2025 मध्ये तंत्रज्ञान प्रकल्पांचे होणार भव्य प्रदर्शन
PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची होणार भेट? जयशंकर यांच्या अमेरिका भेटीनंतर मिळाले संकेत
तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनच्या उद्घाटनाचे आयोजन गुरुवारी २५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. यामध्ये TAITIRA चे चेअरमॅ जेम्स सी. एफ. हुआंग, तैवानचे आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता देखी या समारंभासाठी सहभागी होईल. हे प्रदर्शन तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले आहे.
२६ सप्टेंबर रोडी ग्रॅंड प्रॉडक्ट लॉन्च सेशव आयोजित केले जाणार आहे. या प्रदर्शनाअंतर्ग ICT, स्मार्ट लिव्हिंग, हेल्थकेअर, अत्याधुनिक गॅजेट्स आणि औद्योगिक सोल्यूशन्समधील जागतिक स्तरावरील नवकल्पना भारतात आणण्याचा सरकारचा हेतू आहे.
तसेच सेलिब्रिटी इन्फ्लुएंसर अवनीत कौरचे विशेष सत्र देखील आयोजित करण्यात आले आहे. तर २७ सप्टेंबर रोजी इंटरॅक्टिव शोकेस आणि बिझनेस नेटवर्किंद सत्रांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामुळे भारत आणि तैवानमधील व्यावसायिक व तांत्रिक संबंध आणखी दृढ होतील.
१९९३ मध्ये सुरु झालेल्या तैवान एक्सलन्सला नवीन विचारांचे, गुणवत्ता आणि विश्वासहार्यातेचे प्रतीक मानला जातो. या वर्षीच्या पॅव्हेलियनमध्ये २२ पुरस्कार-विजेते तैवानी ब्रँड सहभागी होत आहेत. MSI, Transcend, TEAMGROUP, Zyxel, Advantech यांसारखे प्रमुख ब्रँड भारतात पहिल्यांदाच आपली उत्पादने प्रदर्शित करणार आहे. या कंपन्या तैवानच्या तांत्रिक विविधता आणि उत्कृष्टतेचा अनुभव पाहायला मिळेल.
भारत व तैवान यांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होत आहेत. २०२४ मध्ये भारत आणि तैवानचा द्विपक्षीय व्यापार अमेरिकन डॉलर १०.६ अब्जांपर्यंत पोहोचला होता. सध्या २०० हून अधिक तैवानच्या कंपन्या भारतात इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि औद्योगिक क्षेत्रांत गुंतवणूक करत आहेत. भारताने २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी भारत-तैवान संबंध महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
FAQs(संबंधित प्रश्न)
तैवान भारतात कशाचे आयोजन करणार आहे?
तैवान एक्सलन्स (TE) भारतात दोन्ही देशांच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान संबंधांवा गती देणाऱ्या एका भव्य प्रदर्शनाचे आयोजन करणार आहे.
२०२४ मध्ये भारत आणि तैवानच्या द्विपक्षीय व्यापार करार किती होता?
२०२४ मध्ये भारत आणि तैवानचा द्विपक्षीय व्यापार अमेरिकन डॉलर १०.६ अब्जांपर्यंत पोहोचला होता.
तैवानने भारताच्या किती कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे?
भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि औद्योगिक अशा क्षेत्रातील २०० हून अधिक कंपन्यांमध्ये गूंतवणूक केली आहे.






