जयशंकर यांची UNGA च्या पार्श्वभूमीवर समकक्ष मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक ; अनेक जागितक मुद्यांवर झाली चर्चा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
S. Jaishankar in UNGA : अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे ८० अधिवेशन सुरु आहे. यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) उपस्थित होते. यावेळी त्यांनी जगभरातील समकक्ष मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सर्व परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय संबंधावर आणि अनेक जागतिक मुद्यांवर चर्चा केली. याची महिती जयशंकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली. हे अधिवेशन २१ सप्टेंबर ते २९ सप्टेंबरपर्यंत आहे.
एस. जयशंकर यांनी नेदरलॅंड्स परराष्ट्र मंत्र्यासोबत चर्चा केली. यावेळी डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड व्हॅन वीले यांच्याशी झालेल्या बैठकीत त्यांनी युरोपच्या धोरणात्मक स्थितीव व भाराताच्या दृष्टीकोनावर चर्चा केली.
Appreciated the meeting with FM David van Weel of the Netherlands this evening in New York. An insightful conversation on European strategic positioning and India’s approach. @ministerBZ 🇮🇳 🇳🇱 #UNGA80 pic.twitter.com/Uon6abWtcP — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 24, 2025
तसेच जयशंकर यांनी डेन्मार्कचे परराष्ट्र मंत्री मार्क लोके रासमुलेम यांचीही भेट घेतली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी युरोपमधील विकास आणि युक्रेन संघर्षावर चर्चा सविस्तर चर्चा केली. तसेच युरोपीयन युनियन परिषद आणि भारतातील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला.
Appreciated the conversation with FM @larsloekke of Denmark this evening in New York. Valued his insights on latest developments in Europe and the Ukraine conflict. Also discussed our bilateral ties and India-EU cooperation under the Danish Presidency. #UNGA80
🇮🇳 🇩🇰 pic.twitter.com/DnsRrHrzjO — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 24, 2025
PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची होणार भेट? जयशंकर यांच्या अमेरिका भेटीनंतर मिळाले संकेत
एस. जयशंकर यांनी यावेळी श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ यांच्यासोबतही भारत आणि श्रीलंकेतील द्विपक्षीय सहाकार्यावर चर्चा केली.
Pleasure meeting FM @HMVijithaHerath of Sri Lanka. Reviewed the progress of our bilateral cooperation. 🇮🇳 🇱🇰 #UNGA80 pic.twitter.com/OfcdemtKH5 — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 24, 2025
याशिवाय जयशंकर यांनी मॉरिशचे परराष्ट्र मंत्री रितेश रामफुल यांची भेट घेतली. तसेच मालदीवचे परराष्ट्र मंत्री, अब्दुल्ला खलील यांच्याशीही चर्चा केली. यावेळी त्यांनी मालदीवाच्या विकासासाठी भारताच्या समर्थनाचे पुनरुच्चारन केले. याशिवाय त्यांनी, सिंगापूर, लेसोथो, सुरिनाम, सोमालिया, सेंट लूसिया व जमिका या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी देखील स्वतंत्र बैठक झाली.
जमिकाच्या परराष्ट्र मंत्र्याचे पुन्हा पदावर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि भारत आणि जमिका मैत्री अधिक मजबूत करण्यावर आशा व्यक्त केला.तसेच जयशंकर यांनी ग्लोबल साउथच्या प्रमुखांशीही चर्चा केली. या उच्चस्तरीय बैठीकदरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेतील ताज्या घडामोडींवर आणि जगभारतील संपर्क सुविधांवरही चर्चा झाली.
याशिवाय जयशंकर यांनी युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या अनऔपचारिक बैठकीतही सहभाग घेतला. यावेळी भारत-युरोपीयन युनियन भागीदारी, युक्रेन संघर्ष, गाझा संघर्ष, उर्जा आणि व्यापार, या विषायांवर विचारविनिमय करण्यात आला.
एस. जयशंकर यांनी UNGA मध्ये कोणत्या कोणत्या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली?
एस. जयशंकर यांनी UNGA मध्ये नेदरलॅंड्स, डेन्मार्क, सिंगापूर, लेसोथो, सुरिनाम, सोमालिया, सेंट लूसिया व जमिका या देशांच्या परराष्ट्र मंत्र्याशी चर्चा केली.
कोणत्या मुद्यांवर करण्यात आली चर्चा?
या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठीकदरम्यान द्विपक्षीय संबंध, युक्रेन संघर्ष, गाझा संघर्ष, उर्जा आणि व्यापार, तसेच युरोपियन युनियन भागीदारी यांसारख्या विषयांवर विचार विनिमय करण्यात आला.
‘भारत अमेरिकेसाठी महत्त्वाचा’ ; जयशंकर यांची भेट घेतल्यानंतर मार्को रुबियो यांचे महत्त्वपूर्ण विधान