आरोपीला झाली पळता भूई थोडी! कॅनडात जाण्यापूर्वी मुसक्या आवळून आणणार भारतात (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय विशाल कुमार भारतीय नागरिक असून त्याच्यावर हत्येचा आरोप आहे. त्याला अमेरिकेच्या कस्टम्स अँड बॉर्ड प्रोटेक्शन (CBP) ने अटक केली आहे. विशाल बनावट कागपत्रांच्या आधारावर कॅनडाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पण बायमेट्रिक तपासणीदरम्यान त्याचे सत्य उघडं झाले आणि सीबीपीने त्याला तात्काळ अटक केली. तसेच त्याला कॅनडात प्रवेशही नाकारण्यात आला.
मीडिया रिपोर्टनुसार, विशाल कुमारला १६ नोव्हेंबर रोजी बेफेलो पोर्ट येथील पीज ब्रिज बॉर्डवर क्रॉसिंगरवर अटक करण्यात आली होती. विशाल भारतात हत्या करुन २०२४ मध्ये अमेरिकेत बेकादेशीर मार्गाने घुसला होता. विशालला अटक करण्यात आल्यानंतर सीबीपी अधिकाऱ्यांनी त्याला इमिग्रेशन कस्टम्स एन्फोर्समेंट रिमून्हल ऑपरेशन्सच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात सोपवले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीतनुसार, सध्या त्याला अटक करण्यात आली असून न्यूयॉर्कच्या फेडरल तुरुंगात ठेवण्यात आले आहे. भारतीय तपास यंत्रणा त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी करत आहे.
विशालने २०२४ मध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपण घुसखोरी केली होती. नुकतेच तो अमेरिकेतून कॅनडात जाण्याच्या तयारीत होता. त्याने आपली ओळख बदलली होती. पण तो पळून जाण्यापूर्वीचे त्याचे सत्य बाहेर पडले आणि सीबीपी अधिकाऱ्यांनी त्याला ताब्या घेतले. बायमेट्रिकमुळे त्याची खरी ओळख पटली. अमेरिकेच्या सीबीपी अधिकाऱ्यांना तपासादरम्यान इंटरपोल रेड नोटिसमध्ये विशाल भारतात एका खूनात सामील असल्याचे आढळून आले. यामुळे त्याला तात्काळ अटक करत भारतीय तपास यंत्रणेला याची माहिती देण्यात आली.
एक दिवसापूर्वीच भारताचा आणखी एक आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) चा भाऊ अनमोल बिश्नोईला भारतात आणण्यात आले आहे. त्याला ११ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. अनमोलवर बाबा सिद्दीकी, सिद्धू मूसेवाला यांच्या हत्याकांडाचा आरोप आहे. तसेच भारतीय अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार घडवून आणल्याचा आणि इतर काही गंभीर गुन्ह्यांचे आरोप त्याच्यावर आहेत. मुंबई पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार आहे.
Anmol Bishnoi Arrest : गँगस्टर अनमोल बिश्नोई लवकरच दिल्लीत; NIA ने आवळल्या मुसक्या






