भारत वाईट... भारतावर टीका, अमेरिका-चीनचं कौतुक; पेप्सिकोच्या माजी CEO इंदरा नुयी यांचे खळबळजनक विधान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एका मुलाखतीत बोलताना इंद्रा नुयी यांनी भारताची अमेरिका आणि चीनशी तुलना केली. त्यांनी अमेरिका हा प्रतिभेला संधी देणार एक उत्तम देश असलयाचे म्हटले. तसेच त्यांनी चीननेही मोठी प्रगती केली आहे असे म्हटले. नुयी यांनी भारताला अत्यंत वाईट देश म्हणत ‘मी इथे राहिले असते तर एवढ्या मोठ्या कंपनीची सीईओ झाले नसते,’ असे म्हटले.
त्यांच्या मते भारतात व्यक्तीच्या गुणवत्तेपाक्षा जास्त इतर गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाते. याच्या तुलनेत अमेरिकेत कौशल्य आणि व्यक्तीच्या कामगिरीच्या आधारे निर्णय घेतला जातो. असे म्हणत त्यांनी भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील वर्किंग कल्चवर टीका केली आहे.
त्यांनी असे म्हटले, भारतात राहण्यापेक्षा चीनमध्ये पर्यटक म्हणून राहणे पसंत करेल. जर कोणाला चांगल्या जीवनशैलीची आवड असले तर त्याने भारतात राहूच शकत नाही. इथली सुंदरता अत्यंत अस्थाव्यत आहे असे त्यांनी म्हटले. याशिवाय त्यांनी भारताच्या सुरक्षेवर बोलताना, भारताने सुरक्षेसाठी अमेरिकेशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे असल्याचे म्हटले.
नुयी यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त करत भारतातील उद्योग, स्टार्टअप्स आणि जागतिक स्तरावर यशस्वी झालेल्यांची उदाहरणे सांगितले आहेत. तर काहींनी नुई यांनी भारतातील कॉर्पोरेटमधील अडचणींवर योग्य विधाव केले असल्याचे म्हटले आहे. तसेच काहींनी त्यांच्या या वक्तव्यामुळे भारताती प्रतिमा खराब झाल्याचे म्हटले आहे.
नुयी यांनी यापूर्वी देखील भारताला अराजक पण वेगळा आकर्षणाचा देश म्हणून संबोधले होते. भारतातील विविधता, गोंधळ आणि वेगवेगळ्या व्यवस्थांमुळे हा देश इतरांपेक्षा वेगळा आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. परंतु सध्या नुयी यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील वर्क कल्चरबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
Former PepsiCo CEO Indira Nooyi Statement On 🇮🇳Indian System She Says “I could never have become CEO in any other country, including 🇮🇳India. It was only possible because 🇺🇸America rewards merit.” #India #Indian #IndianSystem #US #USA #IndiaUS #Pepsi #IndiraNooyi pic.twitter.com/dPQjHuYsm2 — Globe Wire 24 🌍 (@Globewire24) July 2, 2026
Pakistan Bus Accident : पाकिस्तानमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस दरीत कोसळून ३० हून अधिक लोकांचा मृत्यू






