संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

इराण आणि इस्रायलमधील (Iran-Israel War) संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात काही दिवसांपूर्वी इराणच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला चढवला.

    तेहरान : इराण आणि इस्रायलमधील (Iran-Israel War) संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात काही दिवसांपूर्वी इराणच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला चढवला. इस्रायलच्या काही भागांमध्ये इराणने डागलेले ड्रोन व क्षेपणास्त्रे कोसळली.

    अनेक क्षेपणास्त्रे इस्त्रायलच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याच्या आधीच उद्धवस्त करण्यात आल्याचा दावा इस्रायलतर्फे करण्यात आला आहे. इराणने रविवारी 185 ड्रोन, 110 बॅलेस्टिक आणि 36 क्रूझ क्षेपणास्त्रे इस्त्रायलवर डागली. या पार्श्वभूमीवर एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरून इराणच्या हल्ल्याचा निषेध केला जात असताना इराणने मात्र हा हल्ला अधिक आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, इस्त्रायल लवकरच इराणला प्रत्युत्तर देऊ शकतो, असे मानले जात आहे.

    इराणने संयुक्त राष्ट्राला पत्र लिहून आम्ही स्वसंरक्षणार्थ हल्ला केला आहे. मात्र, इस्रायलने पुन्हा आमच्यावर हल्ला केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असे म्हटले आहे. या युद्धात अमेरिकेने इस्त्रायलला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

    दरम्यान, अधिकांश क्षेपणास्त्रे आणि ड्रोन इराणमधूनच डागण्यात आले असले तरी काही क्षेपणास्त्रे इराक आणि यमन येथूनही डागण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्याची सूचना मिळताच पश्चिमी देशांनी इस्रायलच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.