शादी तो होती रहेगी...! लग्नाच्या धामधुमीत नवरदेवाने 'असं' काही केलं की, पाहून हसू आवरणार नाही, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेमकं काय केलं नवरदेवाने
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की नवरदेव लग्नाच्या भरजरी शेरवानीमध्ये दिसत आहे. आजूबाजूला वऱ्हाडी मंडळी आहेत. लग्नाचा माहोल सजला आहे. नवरदेव माज्ञ रस्त्याच्या कडेला बसून एका गाडीचे पंचर काढताना दिसत आहे. लग्नाचा विधी सोडू पंचर काढत बसलेल्या नवरदेवाला पाहून लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील आवाक् झाले आहे. परंतु लोकांनी नवरदेवाचे कौतुक केले आहे.
व्हायरल व्हिडिओ
शादी तो होती रहेगी, धंधा नहीँ रुकना चाहिए 🤓🤓🤓 pic.twitter.com/MHAYAEtJ26 — HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) April 18, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मएक्सवर @HasnaZaruriHai या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, कामाप्रती निष्ठा ही सर्वात मोठी असते हे पठ्ठ्यानं दाखवून दिलं, तर दुसऱ्या एकाने आयुष्यभराची गाठ बांधली आहे, त्यासाठी पोटापाण्याच्या व्यवसायला विसरु शकत नाही असे म्हटले आहे. तर काही लोकांनी मजेशीर कमेंट्स करत नवऱ्याची खेचली आहे. एका नेटकऱ्याने असा कष्टाळू नवरा भेटायला नशीब लागतं असे म्हटले आहे, तर आणखी एका नेटकऱ्याने नक्कीच गॅरेज असाव गिऱ्हाईक परत जाऊ नये म्हणून रिस्क घेतली असणार भावानं असे म्हटले आहे. सध्या या व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






