फोटो सौजन्य: iStcok
नवी दिल्ली: इराणमधे तीव्र उष्णतेची लाट आली आहे. येथील एका गावात 82.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवले आहे. येथील हवामान केंद्राने 28 ऑगस्ट रोजी ८२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. हे पृथ्वीवरील सर्वाधिक नोंदलेला उष्णता निर्देशांक आहे असे सांगण्यात येत आहे. अमेरिकन हवामानशास्त्रज्ञ कॉलिन मॅककार्थी यांनी त्यांच्या ऑफिसिअल एक्स अकाऊंटवर याची ही माहिती शेअर केली आहे. मात्र, यावरही त्यांनी शंका व्यक्त केली. अधिकृत चौकशीची गरज त्यांनी व्यक्त केली.
इराणच्या हवामान विभागाने तापनात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनवुसार, तेहरानमध्ये गुरूवारी ( 5 सप्टेंबर) दुपारी गडगडाटी वादळासह अंशतः ढगाळ वातावरण असेल. तसेच इराण आणि शेजारील देशांत देखील अधिकाऱ्यांनी उष्णतेचा इशारा जारी केला आहे. विभागाने नागरिकांना उष्णतेशी संबंधित आजारापासून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
A heat index of 180°F (82.2°C) and a dew point of 97°F (36.1°C) were recorded in southern Iran today.
If these readings are confirmed this would be the highest heat index and dew point ever recorded on Earth. pic.twitter.com/SUfYnJGERT
— Colin McCarthy (@US_Stormwatch) August 28, 2024
हवामान तज्ज्ञांची चिंता वाढली
इराणमदील दक्षिण भागातील किनारपट्टीवर डेसेस्तना विमानतळाजवळ असलेला हवामान केंद्राने याची नोंद घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणमध्ये 180 फॅरेनहाइट अंश (82.2°C) आणि दवबिंदू 97 फॅरेनहाइट अंश (36.1°C) नोंदवले गेले. या बातमीने जगभरातील हवामान तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. दवबिंदू हे तापमान आहे ज्यावर हवा यापुढे आर्द्रता ठेवू शकत नाही. माहितीनुसार, 40 ते 54 अंश सेल्सिअस उष्मा निर्देशांक असलेल्या तापमानात जास्त काळ राहिल्यास उष्माघाताचा धोका वाढतो.
हे देखील वाचा – रशियाचे MI-18T हेलिकॉप्टर 22 जणांसह बेपत्ता; शोध मोहिम सुरू
उष्णतेच्या लाटेमुळे पश्चिम आशियात चिंता वाढली
अमेरिकन हवामानशास्त्रज्ञ मॅककार्थी यांच्या मते, पश्चिम आशियामध्ये चिंताजनक उष्णतेची लाट कायम आहे. मीडिया रिपोर्टनुसार, धाहरान, सौदी अरेबिया येथील एका हवामान केंद्राने ९३°F (३३.९C) पर्यंत दवबिंदू नोंदवला आहे. पश्चिम आशियातील अनेक भागात तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.