अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत म्हटले असले तरी प्रत्यक्षात भारतीय बाजारपेठ वाढत आहे (फोटो - सोशल मीडिया)
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत असतात. त्यांनी त्यांच्या अनेक निर्णयांनी संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. त्यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढलेच आहे, परंतु आता अमेरिकन नागरिकांनी देखील देशातून हद्दपार करण्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक निर्णय घेतला आहे.
मंगळवारी (१ जुलै) ट्रम्प यांनी काही अमेरिकन नागरिकांना देशातून हद्दपार करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले आहे की, ज्या लोकांनी गंभीर गुन्हे केले आहेत म्हणजेच बेसबॉल बॅटने एखाद्याला मारणे, अशा लोकांनी देशाकून हद्दपार केले जाईल. त्यांच्या अमेरिकेत जन्म झाला असेल तरीही त्यांना देशातून हाकलले जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी फ्लोरिडामधील एका स्थलांतरित केंद्राला भेट दिली त्यावेळी हे विधान केले. त्यांनी म्हटले की, गुन्हेगांरांना अमेरिकेत जागा नाही, यामुळे अशा नागरिकांना देशातून बाहेर काढण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी न्यूयॉर्क शहराचे उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, न्यूयॉर्कमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. लोकांनी जाणूनबुजून गुन्हे केले आहेत.
विनाकारण लोकांना मारले आहे. यामुळे या घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांना देशातून हद्दपार केले जाईल असे त्यांनी म्हणणे आहे. त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयावर देशभरातून तीव्र टीका केली जात आहे. अमेरिकन नागरिकांना देशातून बाहेर काढता येत नाही असे टीकाकारांचे म्हणणे आहे. अमेरिकेन कायद्यानुसार, जन्माने नागरिकत्व मिळवणार्या व्यक्तीला देशातून हद्दपार करता येते नाही असे मानवाधिकार संघटनांनी आणि कायदेतज्ञांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या या विधानवामुशळे संवैधानिक वाद निर्माण झाला आहे. यामुळे ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या वेळेचा कायदा आणि सुव्यवस्थेचा अजेंडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. परंतु त्यांच्या या निर्णयाला मानवाधिकार संघटनांनी धोकादायक आणि असंवैधानिक म्हटले आहे. सध्या अमेरिकेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.