इस्लामिक स्टेटचा दहशतवादी अफगाणिस्तानात परतला; चीनने घेतली नागरिकांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
काबुल : इस्लामिक स्टेटने (आयएस) अफगाणिस्तानमध्ये पुन्हा आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. तालिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर अफगाणिस्तानात दहशतवादी गटांविरुद्ध अनेक कारवाया करण्यात आल्या, मात्र आता पुन्हा देशात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. बुधवारी एका चिनी नागरिकाला घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये चिनी नागरिकाचा मृत्यू झाला. आता या हल्ल्याची जबाबदारी आयएसने घेतली आहे. इस्लामिक स्टेटने बुधवारी (२२ डिसेंबर २०२५) रात्री उशिरा आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील पोस्टमध्ये अफगाणिस्तानच्या उत्तर तखार प्रांतात एका चिनी नागरिकाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. या हत्येनंतर चीनने याचा निषेध करत अफगाण सरकारकडून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
इस्लामिक स्टेटने बुधवारी रात्री उशिरा आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील पोस्टमध्ये अफगाणिस्तानच्या उत्तर तखार प्रांतात एका चिनी नागरिकाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. या हत्येनंतर चीनने याचा निषेध करत अफगाण सरकारकडून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनताच सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी केली मोठी घोषणा, ‘अमेरिकेत पुढील 4 वर्षात…’
अनुवादकाला ताब्यात घेतले
अफगाण पोलिसांनी बुधवारी सांगितले की एका चिनी नागरिकाच्या हत्येचा प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे, परंतु हल्ल्यामागे कोण आहे हे स्पष्ट झाले नाही. इस्लामिक स्टेटने म्हटले आहे की त्यांनी एका चिनी नागरिकाला घेऊन जाणाऱ्या वाहनाला लक्ष्य केले, त्याला ठार केले आणि त्याच्या वाहनाचे नुकसान केले. प्राथमिक तपासात तालिबानने चिनी नागरिकाच्या अनुवादकाला ताब्यात घेतले असून, दोषींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘या’ मुस्लिम देशाला मिळाला अब्जावधी डॉलर्सचा खजिना; जमिनीखाली सापडले निळ्या सोन्याचे साठे
अफगाणिस्तानात वाढते दहशतवादी हल्ले
अफगाणिस्तानात दहशतवादी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अलीकडेच, पाकिस्तान सरकारनेही अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांची भरभराट आणि प्रशिक्षणाचा आरोप केला होता. तुम्हाला सांगतो की, परदेशी नागरिकाची हत्या होण्याची ही पहिलीच घटना नाही. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून, ISIS-K ने अफगाण शहरांमध्ये अनेक मोठे हल्ले केले आहेत, ज्यात अनेकदा देशातील शिया समुदायाच्या सदस्यांसह नागरिकांना लक्ष्य केले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी एका हल्ल्यात तीन स्पॅनिश नागरिक आणि तीन अफगाण नागरिकांची हत्या केली होती. या घटनेत अन्य चार परदेशी नागरिकही जखमी झाले आहेत.