इस्त्रायलचा हमासवर हल्ला (फोटो- istockphoto)
इस्त्रायलचा गाझापट्टीवर भीषण हल्ला
गाझा पट्टीवर केला हवाई हल्ला
अनेक महिन्यांपासून सुरू आहे संघर्ष
World War: इस्त्रायलने गाझा पट्टीवर भीषण हल्ला केला आहे. इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचे मोठे नुकसान केले आहे. 9 ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीमध्ये सीजफायर लागू झाले होते. मात्र तरी देखील इस्त्रायलने हमासवर भीषण हल्ला केला आहे. यामध्ये अनेक लहान मुलांचा देखील मृत्यू झाला आहे. यामध्ये 253 लोक जखमी झाले आहेत.
इस्त्रायलने हमासवर मोठा हवाई हल्ला केला आहे. यामध्ये 46 लहान मुले ठार झाले आहेत. तर एकूण 104 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 250 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. सीजफायर झाल्यावर इस्त्रायलने केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यानंतर सीजफायर पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले.
हमासने युद्धबंदीचे उल्लंघन केले व गाझामध्ये तैनात असलेल्या यांच्या सैन्यावर हल्ला केला, असे इस्त्रायलने सांगितले. याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हमासने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही युद्धबंदीचे पालन करत असल्याचे हमासने म्हटले आहे.






