हमास युद्धादरम्यान इस्त्रायलने 'या' व्यक्तीला दिली सैन्याची कमान; कोण आहे नवीन लष्कर प्रमुख? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: सध्या इस्त्रायल आणि हमास युद्धविराम सुरु असून यादरम्यान कैद्यांची सुटका केली जात जात आहे. मात्र, सध्या पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युद्धबंदी चर्चेचा दुसरा टप्पा या आठवड्यात सुरू होणार आहे. याचदरम्यान इस्त्रायलने एक मोठा निर्णय घेतला आहे. इस्त्रायलने आपल्या सैन्याची कमान मेजर जनरल (रेस.) इयाल जमीर यांना सोपवली आहे आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी हा निर्णय घेतला आहे. इयाल जमीर हे लेफ्टिनेंट जनरल हर्ज़ी हलेवी यांची जागा घेणार असून 7 ऑक्टोबरच्या लष्करी अपयशांमुळे 21 जानेवारीला राजीनामा देण्याची घोषणा केली होती.
कोण आहेत इयाल जमीर?
इयाल जमीर यांचा जन्म ईलाट या भागात झाला. त्यांनी 1984 मध्ये इस्त्रायली सैन्यात प्रवेश घेतला होता आणि टँक कमांडर म्हणून कार्य सुरू केले. त्यानंतर ते विविध उच्च पदांवर नेमले गेले. 2012 ते 2015 या काळात पंतप्रधान नेतन्याहू यांचे सैन्य सचिव म्हणून ते कार्यरत होते.
जमीर यांना 2018 आणि 2022 मध्येही चीफ ऑफ स्टाफ बनवण्याचा विचार करण्यात आला होता, मात्र तेव्हा निवड झाली नव्हती. 2023 मध्ये त्यांना संरक्षण मंत्रालयाचे महानिदेशक म्हणून नेमण्यात आले होते. आता त्यांना इस्त्रायली सैन्याचे नवे चीफ स्टाफ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
इस्त्रायलचा आयडीएफ (IDF) चीफ ऑफ स्टाफचा कार्यकाल तीन वर्षांचा असतो. त्यात एका वर्षाच्या विस्ताराचा पर्याय उपलब्ध असतो. इस्त्रायलमध्ये असा शेवटचा प्रसंग 2007 मध्ये घडला होता, जेव्हा लेफ्टिनेंट जनरल डॅन हलुट्ज यांनी 2006 मध्ये झालेल्या दुसऱ्या लेबनान युद्धातील अपयशांनंतर राजीनामा दिला होता.
चौकशी आयोगाची जनतेकडून मागणी
7 ऑक्टोबरला झालेल्या हमास हल्ल्यामुळे इस्त्रायलध्ये मोठा विरोध सुरू आहे. त्या हल्ल्याच्या लष्करी व राजकीय अपयशांवर तपास करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमावा, अशी मागणी जनतेने केली आहे. असा आयोग नेमण्याचे अधिकार सरकारकडे असून, त्याचे नेतृत्व सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश करत असतात.
त्यांना साक्षीदार बोलावणे आणि पुरावे गोळा करण्याचे अधिकार असतात. या आयोगांच्या शिफारसी सरकारला मान्य करणे बंधनकारक नसते. तसेच पंतप्रधान नेतन्याहू यांनी देखील स्वतंत्र तपास आयोग नेमावा मात्र, युद्धानंतर. यामुळे सध्याच्या परिस्थितीत इयाल जमीर यांच्यावर मोठ्या जबाबदारीची कामगिरी सोपवण्यात आली आहे.