Israel Iran War : 'आता इतिहास बदलेल' ; अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर नेतन्याहू आनंदित (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Iran War News Marathi: जेरुसेलम : गेला आठवडाभर इराण आणि इस्रायलमध्ये तीव्र युद्ध सुरु होते. आता या युद्धात अमेरिकेने देखील जोरदार एन्ट्री केली आहे. अमेरिकेने नुकतेच इराणच्या अणुउर्जा ठिकाणांवर बॉम्ब हल्ले केले आहे. या हल्ल्यात इराणचे तीन अणुस्थळे नष्ट झाल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यामध्ये इराणच्या नतान्झ, फोर्डो आणि इस्फेहान या तीन महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आनंद व्यक्त केला आहे.
त्यांनी अमेरिकेच्या या हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नेतन्याहूंनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदने केले आहे. तसेच त्यांनी ट्रम्पच्या या निर्णयामुळे आता इतिहास बदलेले असे महटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करत त्यांनी, “अमेरिकन सैन्याने इराणवर केलेला हल्ला अतिशय यशस्वी हल्ला असल्याचे म्हटले. नेतन्याहू पुढे म्हणाले की, अमेरिकन सैन्याने जे केले, ते इतर कोणत्याही देशाचे सैन्य करु शकले नसते.”
त्यांनी म्हटले की, राष्ट्रपती ट्रम्प तुमचे अभिनंदन. इराणच्या अणु तळांनावर हल्ला करण्याचा तुमचा धाडसी निर्णय आता इतिहास बदलेले. त्यांनी म्हटले की, शांतता केवळ ताकदीनेच प्रस्थापित होत शकते. डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकने सैन्याने यशस्वी कामगिरी केली आहे.
तसेच नेतन्याहू यांनी म्हटले की, त्यांच्या सैन्याने ऑपरेशन रायझिंग लाईनमध्ये इराणच्या अनेक ठिकाणांना उद्ध्वस्त केले. परंतु अमेरिकेच्या सैन्याने जे केले ते अतुलनीय आहे. आतापर्यंत असे कोणत्याही देशाचे सैन्य करु शकले नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आता जगातील सर्वात धोकादायक राजवटीला आव्हान देणारे ठरले आहेत.
#WATCH | “…America has been truly unsurpassed. It has done what no other country on earth could do. History will record that President Trump acted to deny the world’s most dangerous regime, the world’s most dangerous weapons…” says Israeli PM Benjamin Netanyahu as amid… pic.twitter.com/k2TgZIFTm8
— ANI (@ANI) June 22, 2025
दरम्यान यानंतर नेतन्याहूंनी इराणला देखील कडक इशारा दिला आहे. त्यांनी इराणला हल्ले थांबवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, इराणने आता शांत राहायला हवे, त्यांनी इस्रायलवरील हल्ले न थांबल्यास त्यांना भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. भविष्यातील अमेरिकेचे हल्ले अधिक तीव्र आणि गंभीर असतील.
दरम्यान या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, अमेरिकन सैन्याच्या हल्ल्याची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, मी जगाला सांगू इच्छित आहे की अमेरिकेच्या सैन्याने इराणच्या अणु ठिकाणांना उद्ध्वस्त केले आहे. यामध्ये आम्हाला मोठे लष्करी यश मिळाले आहे. इराणच्या प्रमुख अणु सुविधा पूर्णपण नष्ट झाल्या आहेत. त्यांनी सांगतिले की अमेरिका आणि इस्रायल आता इराणविरोधी संयुत्तपण कारवाई करेल.