फोटो सौजन्य: सोशल मीडिया
गाझा: सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष गाझामध्ये अधिक तीव्र होत चालला आहे. इस्रायलने पुन्हा एकदा गाझामध्ये हवाई हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यात 33 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. इस्त्रायली लष्कराने हे हल्ले गाझामधी रेफ्यूजी कॅंपवर केले आहेत. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. याआधी रविवारी झालेल्या हल्ल्यात 6 पॅलेस्टिनी ठार झाले होते. जेव्हा इस्रायली लष्कराने एका कारवर लक्ष्य करून हवाई हल्ला केला.
सर्वत्र शोककळा पसरली आहे
मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायली सैन्य हमासच्या दहशतवाद्यांना संपुष्टात आणण्याच्या नावाखाली सतत पॅलेस्टिनींवर हल्ले करत आहे. रविवारी झालेल्या हल्ल्यात 6 जण ठार, तर अनेक जखमी झाले. जखमी आणि मृतांना अल-अक्सा शहीद रुग्णालयात नेण्यात असता, तेथे शोककळा पसरली होती. मृतांच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रियजनांच्या मृत्यूचे दु:ख होत असताना, नंतर नमाज अदा करून अंत्यसंस्कार करण्यात आले. ऑक्सफॅम या मानवतावादी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यांत जबलिया येथे काम करणारे त्यांच्या 6 कामगारांचाही मृत्यू झाला आहे.
हे देखील वाचा- याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर इस्रायलचा गाझामध्ये कहर; हमास लष्कराच्या निशाण्यावर
युद्ध थांबवण्याची मागणी
गाझा आणि लेबनॉनवर सतत होणाऱ्या हल्ल्यांविरोधात जगभरात निदर्शने सुरू आहेत. निदर्शकांनी इस्रायलला युद्ध थांबवण्याची आणि तातडीने युद्धबंदीची मागणी केली आहे.ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 42,500 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि 70,000 पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले आहेत. लाखो लोक बेघर झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच इस्रायलने गाझामधील बीट लाहिया शहरात मोठे हल्ले केले होते. या हल्ल्यामध्ये 73 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती हमासने दिली.
जागतिक पातळीवर चिंतेत वाढ
गाझा आणि लेबनीज सीमेवरील या ताज्या घटनांमुळे इस्रायल आणि हमास तसेच हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढत चालली आहे. तसेच एकीकडे रशिया-युक्रेनमध्ये देखील संघर्ष तीव्र होत चालला आहे.