बांगलादेशात अमेरिकेचा 'गेम प्लॅन'! कट्टरपंथी जमात-ए-इस्लामीशी वाढवली जवळीक; भारताच्या टेन्शनमध्ये वाढ? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Bangladesh Election February 12 2026 news : शेजारील देश बांगलादेशात (Bangladesh) १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे दक्षिण आशियातील भू-राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ‘जमात-ए-इस्लामी’ (Jamaat-e-Islami) या कट्टरपंथी संघटनेवर भारताने बंदी घातली आहे आणि जिचा इतिहास रक्तरंजित राहिला आहे, त्याच संघटनेशी अमेरिकेने आपले संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका खळबळजनक अहवालानुसार, अमेरिकन (America) राजनैतिक अधिकारी आता उघडपणे ‘जमात’ला आपला मित्र बनवण्याची भाषा करत आहेत, ज्यामुळे भारताच्या राजनैतिक वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ डिसेंबर २०२५ रोजी ढाका येथे महिला पत्रकारांसोबत झालेल्या एका बंद दाराआड बैठकीत अमेरिकन राजदूतांनी स्पष्ट केले की, बांगलादेश आता ‘इस्लामिक दिशेने’ वळला आहे. एका व्हायरल ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार, हे राजदूत म्हणाले, “आम्हाला त्यांना (जमात) आमचे मित्र बनवायचे आहे.” इतकेच नाही तर, त्यांनी पत्रकारांना विचारले की, ते ‘जमात’च्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांना त्यांच्या चर्चासत्रात आमंत्रित करू शकतील का? अमेरिकेचा हा बदललेला पवित्रा भारतासाठी धक्कादायक आहे, कारण भारत ‘जमात’ला एक दहशतवादी विचारांची संघटना मानतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-UAE Friendship: मोदी-नाह्यान मैत्रीचा ‘ग्रँड’ निकाल! 900 भारतीय कैद्यांची सुटकेचा मेगा प्लॅन; स्वतः UAE सरकारने भरला दंड
अनेक तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली आहे की, जर ‘जमात’ सत्तेत आली तर बांगलादेशात ‘शरिया कायदा’ लागू होऊ शकतो. मात्र, अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर असे काही घडले तर अमेरिका बांगलादेशाच्या निर्यात उत्पादनांवर (प्रामुख्याने कापड उद्योग) १००% शुल्क लावून त्यांची अर्थव्यवस्था रोखू शकते. मात्र, अमेरिकेचा हा ‘आर्थिक धाक’ भारताला पुरेशी सुरक्षा देऊ शकेल का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
#BREAKING : 🇧🇩 🇺🇸 Washington Post leak involves a significant shift in U.S. foreign policy toward Bangladesh, specifically concerning its engagement with the Jamaat-e-Islami party. 👇 The leak is based on audio recordings from a closed-door meeting held on December 1, 2025,… pic.twitter.com/kU2T6Myl5L — ConflictX (@ConflictXtweets) January 23, 2026
credit – social media and Twitter
१. पाकिस्तानशी जवळीक: जमात-ए-इस्लामीचा इतिहास पाहता, हा पक्ष नेहमीच पाकिस्तानधार्जिणा राहिला आहे. १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी पाकिस्तानी सैन्याला साथ दिली होती. २. ईशान्य भारताची सुरक्षा: बांगलादेशात कट्टरपंथी सरकार आल्यास भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये (Seven Sisters) घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया वाढण्याचा धोका असतो. ३. हिंदू अल्पसंख्याकांचे भवितव्य: गेल्या काही महिन्यांत बांगलादेशातील हिंदूंची घरे आणि मंदिरे जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. जमातची वाढती ताकद या हिंसाचाराला अधिक खतपाणी घालू शकते, अशी भीती दिल्लीला वाटत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Affairs: UN मध्ये भारताची गुगली! इराणविरोधी ठरावावर ‘No’ म्हणत पाश्चात्य देशांना दिले राजनैतिक पण कठोर प्रत्युत्तर
यावेळची निवडणूक विशेष आहे कारण शेख हसीना यांचा ‘अवामी लीग’ पक्ष रिंगणाबाहेर आहे. मुख्य लढत आता ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (BNP) आणि ‘जमात-ए-इस्लामी’ यांच्यातील युती विरुद्ध इतर लहान पक्ष अशी असणार आहे. अमेरिकेचा ‘जमात’कडे असलेला कल भारत-अमेरिका संबंधांमध्येही कटुता आणू शकतो, जे आधीच व्यापार आणि रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यांवरून तणावाखाली आहेत.
Ans: बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहेत.
Ans: हा पक्ष भारतविरोधी, पाकिस्तानधार्जिणा आणि कट्टरपंथी इस्लामिक विचारधारेचा असल्याने भारताने यावर बंदी घातली असून सुरक्षेसाठी तो धोका मानला जातो.
Ans: शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत जमात ही मोठी राजकीय शक्ती बनत असल्याने, भविष्यातील सरकारशी संबंध ठेवण्यासाठी अमेरिका हा पवित्रा घेत असल्याचे बोलले जाते.






