बांग्लादेशमध्ये हिंदू समाजाला धमकी (फोटो- istockphoto)
बांग्लादेशमध्ये केले जाते हिंदूंना टार्गेट
मकर संक्रांतवरून हिंदूंना धमकी
बांग्लादेशमध्ये जमात-ए-इस्लामीने दिली धमकी
सध्या बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये 5 ते 6 हिंदू व्यक्तींची हत्या करण्यात आली आहे. बांग्लादेशमध्ये लवकरच निवडणूक होणार आहे. याचआधी अल्पसंख्यांक समाजावर तेथे अन्यायाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. खास करून हिंदू समाजाला लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान लवकरच मकर संक्रांत सण जवळ येत आहे. याचआधी जमात ए इस्लामी या कट्टर संघटनेने हिंदू समाजाचा प्रमुख सण असलेला मकर संक्रांत ज्याला बांग्लादेशमध्ये शकरैन म्हणून ओळखले जाते. हिंदू समाजाने मकर संक्रांत साजरी केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा जमात ए इस्लामी या संघटनेने दिला आहे.
जमात ए इस्लामी या कट्टर संघटनेने हिंदू समाजाच्या मकर संक्रांत सणाला लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिकरित्या सण साजरा केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराच या संघटनेने दिला आहे. संगीत वाजवणे, पतंग उडवणे, कोणत्याही प्रकारचा उत्सव हा गैर इस्लामी म्हणून जमात ए इस्लामीच्या नेत्यांनी घोषित केले आहे. या कृती इस्लामिक मूल्यांचे उल्लंघन करतात असे या संघटनेचे म्हणणे आहे.
बांगलादेशात 12 वर्षीय हिंदू मुलीचा संशयास्पद मृत्यू
बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावरील अत्याचाराच्या बातम्या सातत्याने समोर येत असतानाच, आता चितगावमधून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. लालखान बाजार परिसरात राहणाऱ्या श्रावंती घोष या अवघ्या १२ वर्षांच्या मुलीचा मृतदेह तिच्या घरात संशयास्पद स्थितीत लटकलेला आढळला. ४ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?
श्रावंती घोष ही लालखान बाजार सरकारी प्राथमिक शाळेत चौथी इयत्तेत शिकत होती. तिचे वडील तपन घोष हे नोकरीनिमित्त घराबाहेर असतात, तर आई रोझी घोष एका कपड्याच्या कारखान्यात काम करतात. घटनेच्या दिवशी श्रावंती रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या आजोबांच्या घरून एकटीच राहत्या घरी आली होती. अर्ध्या तासानंतर जेव्हा तिचे आजोबा धाकट्या नातवाला घेऊन घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घराचे दार उघडे दिसले. आत गेल्यावर श्रावंती छताला लटकलेल्या अवस्थेत आढळली.






