विमान अचानक २६,००० फूट उंचीवरून खाली आलं, घाबरलेल्या प्रवाशांनी निरोपाचे मेसेज लिहिले, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक (फोटो सौजन्य-X)
Japan Airlines News in Marathi : अहमदाबाद विमान दुर्घटना ही चर्चेत असताना सोमवार, 30 जून रोजी संध्याकाळी जपान एअरलाइन्सचे बोईंग ड्रीमलायनर 737 विमान अचानक हवेत सुमारे 26000 फूट खाली आल्याची घटना घडली. यामुळे घाबरलेल्या प्रवाशांना ऑक्सिजन मास्क घालावे लागले, तर अनेकांना आपला शेवट जवळ आल्याचं वाटलं. अहमदाबादमध्ये बोईंग ड्रीमलायनर 787 विमानाला च्या झालेल्या भीषण अपघातानंतर काही आठवड्यांनीच ही भयंकर घटना घडली आहे. या अपघातामुळे विमान निर्मात्याच्या सुरक्षिततेच्या नोंदीबद्दल अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.
जपानमध्ये एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळला. चीनमधील शांघायहून टोकियोला जाणारे जपान एअरलाइन्सचे बोईंग ७३७ अचानक २६ हजार फूट उंचीवरून खाली आले. विमान अचानक उंची कमी होत असल्याचे पाहून प्रवासी घाबरले. त्यांनी मास्क घातले. यादरम्यान काही प्रवाशांनी त्यांचे मृत्युपत्र लिहिण्यास सुरुवातही केली.
३० जून रोजी जपान एअरलाइन्सचे विमान चीनमधील शांघाय पुडोंग विमानतळावरून टोकियोमधील नारिता विमानतळावर उड्डाण करत होते. जपान एअरलाइन्स आणि स्प्रिंग जपान एअरलाइन्सच्या उपकंपनी यांच्यात कोडशेअर करार असलेल्या या विमानात १९१ प्रवासी होते. विमान ३६ हजार फूट उंचीवर होते. दरम्यान, विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि १० मिनिटांत ते २६ हजार फूट उंचीवरून १०५०० फूट उंचीवर कोसळले. विमान खाली येत असल्याचे पाहून प्रवासी घाबरले. अपघाताच्या भीतीने प्रवाशांनी मास्क घातले.
एका प्रवाशाने सांगितले की, मला आवाज ऐकू आला आणि काही सेकंदातच ऑक्सिजन मास्क पडला. दरम्यान, एक एअर होस्टेस आली आणि मास्क घालण्यास सांगितले. तिने सांगितले की, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला आहे. दरम्यान, काही प्रवासी विमानात झोपले होते. काही प्रवाशांनी त्यांचा शेवटचा मेसेज लिहण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी त्यांच्या नातेवाईकांना पिन आणि विम्याची माहिती पाठवायला सुरुवात केली. एका प्रवाशाने सांगितले की जेव्हा मी माझे मृत्युपत्र, विमा आणि बँक कार्ड पिन लिहित होतो तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.
विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर, वैमानिकाने सतर्कता दाखवली आणि आपत्कालीन लँडिंगबद्दल एटीसीला माहिती दिली. यानंतर, विमान जपानमधील ओसाका येथील कान्साई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात आले. विमान रात्री ८:५० वाजता (स्थानिक वेळेनुसार) ओसाका येथे सुरक्षितपणे उतरले. प्रवाशांना भरपाई म्हणून १५,००० येन (US$९३) आणि एका रात्रीसाठी हॉटेल रूम देण्यात आली. एअरलाइनने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
गुरुवार, १२ जून रोजी, अहमदाबादहून लंडनला जाणारे बोईंग ड्रीमलाइनर ७८७-८ एअर इंडिया एआय-१७१ या विमानाच्या अपघातानंतर अवघ्या २ दिवसांनी, १४ जून रोजी जपान एअरलाइन्ससोबतही असाच अपघात झाला. त्यानंतर दिल्लीहून व्हिएन्नाला जाणारे एअर इंडियाचे एआय-१८७ विमान अचानक ९०० फूट खाली हवेत कोसळले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि पायलटला विमान उडविण्यास मनाई केली आहे.