३ फूट उंचीच्या लाटा, जपानमध्ये १६ ठिकाणी त्सुनामी
Russia Tusmnami News: रशियाच्या किनाऱ्यावर ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर रशियाच्या कुरिल बेटांच्या किनारी भागात आणि जपानच्या मोठ्या उत्तरेकडील बेट होक्काइडोच्या किनारी भागात त्सुनामी आली आहे. याशिवाय अमेरिकेच्या दक्षिणेकडील कॅलिफोर्निया, अलास्का, हवाई आणि न्यूझीलंडसारख्या इतर किनाऱ्यांसाठी देखील इशारा जारी करण्यात आला आहे.
जपानच्य हवामान खात्याने जारी केलेल्या सुचनेनुसार, जपानच्या १६ ठिकाणी ४० सेंटीमीटर (१.३ फूट) उंचीची त्सुनामी आढळून आली. या लाटा पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर होक्काइडोपासून टोकियोच्या ईशान्येकडे दक्षिणेकडे सरकत आहेत. यानंतर लाटा आणखी मोठ्या होऊ शकतात. समुद्रात ३ फूट उंचीच्या लाटा उसळू शकतात, त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, जपानमधील चिबा प्रांतातील तातेयामा शहरात अनेक व्हेल समुद्रकिनाऱ्यावर येऊन पोहोचल्याचेही सांगितले जात आहे.
आता ‘या’ आफ्रिकन देशातही दहशतवादाचे सावट; लष्करी हल्लात ५० सैनिकांचा मृत्यू
१० फूट उंच लाटांचा इशारा
पॅसिफिक महासागरात तीन मीटर (१० फूट) पेक्षा जास्त उंचीच्या लाटांसाठी इशारा देण्यात आला होता. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सेवेरो-कुरिलस्क या बंदर शहराला त्सुनामी आली आहे. जिथे सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. शहराच्या काही भागातील इमारती समुद्राच्या पाण्यात बुडाल्या आहेत. रशियातील सरकारी माध्यमांनुसार, भूकंपात अनेक लोक जखमी झाले असले तरी कोणालाही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही.
यासोबतच येत्या काही तासांत हवाई बेटावर त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन यांनी आणीबाणीची घोषणा केली आहे. रशियामध्ये झालेल्या भूकंपामुळे हवाईमध्ये त्सुनामीची धोक्याची घंटा देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. हजारो लोक उंच ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय उत्तर जपानमध्ये त्सुनामीचे सायरन वाजत आहेत आणि किनारी भाग रिकामे केले जात आहेत.
शक्तिशाली भूकंपाने हादरला रशिया; 8.7 तीव्रतेचा मोठा भूकंप, जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा
याशिवाय, आलास्का येथील राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्राने कॅलिफोर्निया, ओरेगॉन आणि वॉशिंग्टनच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. कॅनडाच्या पॅसिफिक कोस्ट प्रांतातील ब्रिटिश कोलंबियाच्या बहुतेक किनाऱ्यावर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या जपानी अणुऊर्जा प्रकल्पांचे काम थांबवण्यात आले आहे.
चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या त्सुनामी चेतावणी केंद्राने शांघाय आणि झेजियांग प्रांतासह देशाच्या पूर्व किनारपट्टीच्या काही भागांसाठी इशारा जारी केला. याशिवाय लाटा ०.३ ते १ मीटर (१ ते ३ फूट) उंचीपर्यंत पोहोचू शकतात, असा इशारा देण्यात आला होता. बुधवारी झेजियांग प्रांतात कोमेई वादळ धडकण्याची शक्यता असल्याने शांघाय आणि झेजियांग शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जपानी आणि अमेरिकन भूकंपशास्त्रज्ञांनी सांगितले की, जपानी वेळेनुसार सकाळी ८:२५ वाजता झालेल्या भूकंपाची सुरुवातीची तीव्रता ८.० होती. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने नंतर त्याची तीव्रता ८.८ इतकी नोंदवली. मार्च २०११ मध्ये ईशान्य जपानमध्ये ९.० तीव्रतेच्या भूकंपानंतर जगातील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे, ज्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पालादेखील मोठा धोका निर्माण झाला आहे.