फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जेरूसेलम: इस्त्रायलचे पंप्रधान बेंजामिन नेतन्याहून यांनी इराणच्या जनतेला उद्देशून एक विशेष व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये नेतन्याहूनी इराणी लोकांना त्याची आशा गमावू नये असे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेतन्याहू यांनी थेट इराणच्या लोकांसाठी हा संदेश दिला आहे. त्यांनी म्हटले आहे ती, इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना इस्त्रायलपेक्षा आपल्या स्वत:च्या जनतेची भिती त्यांना वाटते अशी टिका त्यांनी खामेनेई सरकारवर केली आहे.
खामेनेई सरकारला त्यांच्या जनतेची भिती
या व्हिडिओत नेतन्याहूंनी इराणींना उद्देशून सांगितले की, “तुम्हीच त्या गोष्टी आहात ज्यांची खामेनेई सरकारला सर्वाधिक भीती आहे. तुमच्या आशा गमावू नका.” इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत असताना या पार्श्वभूमीवर हा संदेश आलेला आहे. इस्रायलने लेबनॉनमध्ये इराण समर्थित हिजबुल्लाहवर हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसाठा आणि हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे इराण आणि इस्रायलमधील राजकीय तणावामुळे युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे नेतन्याहू यांनी इराणच्या जनतेला पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे.
हे देखील वाचा- लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागांवर इस्त्रायलचा भीषण हल्ला; 20 हून अधिक लोक ठार
इस्त्रायल इराणच्या जनतेच्या पाठीशी उभे राहील- नेतन्याहू
नेतन्याहू पुढे म्हणाले की, “खामेनेई सरकार स्वतःच्या लोकांच्या आशांना चिरडण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांवर अंकुश ठेवण्यासाठी मोठा पैसा आणि वेळ खर्च करत आहे.” ते इराणींना म्हणाले की, “तुमची स्वप्ने मरू देऊ नका. मी ऐकतो आहे, महिलांसाठी स्वातंत्र्य, जीवन आणि स्वप्न पाहणारे लोक आवाज उठवत आहेत.” नेतन्याहू यांनी इराणच्या जनतेला सांगितले की, “इस्रायल आणि इतर मुक्त जग तुमच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे आशा गमावू नका.”
A special message from me to the Iranian people: there’s one thing Khamenei’s regime fears more than Israel. It’s you — the people of Iran. Don’t lose hope.
پیام ویژهای از من برای مردم ایران: یک چیز هست که رژیم خامنهای بیش از اسرائیل از آن میترسد. آن شما هستید — مردم ایران.… pic.twitter.com/iADxSjNXCs
— Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) November 12, 2024
नेतन्याहूंचा इराणी जनतेला स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी लढा देण्याचा सल्ला
हा संदेश नेतन्याहू यांनी एक्वसर पोस्ट केला असून, त्यातून त्यांनी इराणी जनतेला त्यांच्या स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी लढा देण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे इराणच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नेतन्याहूंचा हा संदेश इराणच्या सरकारविरुद्ध जनमताचा आधार वाढवण्यासाठी असू शकतो, यामुळे इराणमधील अंतर्गत अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.