हवाईमध्ये ज्वालामुखीचा रुद्रावतार; गरम लाव्याचे उडे लागले फव्वारे! VIDEO पाहून उडेल थरकाप (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
हजारो वर्षानंतर इथिओपियात ज्वालामुखीचा विस्फोट; अरब सागर ओलांडून भारतात आली राख
अमेरिकेच्या जिओलॉजिक सर्व्हेनुसार, रविवारी (०७ डिसेंबर) पहाटे जाहीर केले की, किलौओच्या हॅलेमाउमाउ क्रेटरमध्ये उद्रेक सुरु झाला आहे. या ज्वालामुखीत प्रंचड लाव्हा बाहेर पडत आहे. हे दृश्य अगदी कारंज्या सारखे दिसत असून इतिहासात दुर्मिळ मानले जात आहे. यामुळे संपूर्ण आकाश लाला झाले आहे. USGS ने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (०६ डिसेंबर) रात्री उशिरा या ज्वालामुखीचा विस्फोट जाला. विस्फोटानंतर काही क्षणातंच आकाश पूर्णपणे लाल झाले होते. लाव्हा कांरज्यासारख्या बाहेर पडल होता. सध्या USGS ने हवाई राष्ट्रीय उद्यान बंद केले आहे. परंतु कोणताही गंभीर धोका नसल्याचे म्हटले आहे.
हवाईमध्ये ही एक अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे. कारण एकाच वेळी तीन समांतर अंतरापर्यंत कारंज्या सारखा लाव्हा बाहेर पडतक आहे. गेल्या अनेक दशकांपासून किलौआ शांता होता. २०१८ मध्ये या ज्वालामुलीचा सर्वात मोठा उद्रेक झाला होता. ज्यामुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली होती. पण सध्या झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे कोणताही धोका नसल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. तसेच शास्त्रज्ञ संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. हवाई पर्यंटन विभागाने ही एक नैसर्गिक आणि दुर्मिळश घटना असून पर्यटकांसाठी एक संधी असल्याचे म्हॉले आहे. सध्या खबरदारी म्हणून ज्वालामुखाच्या आसपासचा काही परिसर आणि उद्यान बंद करण्यात आले आहे.
सध्या सोशल मीडियावर #KilaueaEruption आणि #HawaiiVolcano हे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. याचे अनेक व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहे. ड्रोन आणि दुर्बिनने काढलेले अद्भुत व्हिडिओ लोकांनी शेअर केले आहेत. रात्रीचे आकाश पूर्णपणे लाल झाल्याचे दिसत आहे.
WATCH: Incredible eruption of Kilauea volcano in Hawaii today, with a rare triple fountain event 🌋 pic.twitter.com/p9F2ca7aP9 — Insider Paper (@TheInsiderPaper) December 7, 2025






