मेक्सिकोत बस आणि ट्रकचा भीषण अपघात; आगीत 41 जणांचा होरपळून मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मेक्सिको: मेक्सिकोत एक भीषण रस्ता अपघाताची घटना घडली आहे. ताबास्को राज्यात शनिवारी सकाळी (८ फेब्रुवारी) बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकीमुळे बसने पेट घेतला आणि बसमधील 48 प्रवासीपैकी 38 जणांचा आणि दोन बस चालकांचा मृत्यू झाला. तसेच ट्रक चालकाचा देखील मृत्यू झाला आहे. बसने त्वरित आग पकडली आणि अनेक प्रवासी जिवंत जळाले गेले आहेत. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, बस पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसत आहे. सुरक्षा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फक्त 18 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. ट्रक आणि बसची धडकी इतकी जबरदस्त होती की, बसने त्वरित पेट घेतला. प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नाही. घटनेनंतर बस पूर्णतः जळून खाक झाली, फक्त लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला.
TRAGEDY IN MEXICO 🚨🚌 Over 32 killed in bus crash in southern Mexico 🌪️🕊️
The bus was traveling from Cancun to Tabasco with 44 passengers on board 😞 pic.twitter.com/EVjo3LE7kG
— The Viral Videos (@The_viralvideo_) February 9, 2025
सुरक्षा यंत्रणांनी बचावकार्य सुरू केले असून, आत्तापर्यंत केवळ १८ मृतदेहांची ओळख पटली आहे. जळून खाक झालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कठीण होत आहे, त्यामुळे तपास यंत्रणा डीएनए चाचणीच्या आधारे मृतांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. बचावकार्य अद्याप सुरूच आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बससेवेचे संचालन करणाऱ्या ‘टूर्स एकोस्टा’ कंपनीने या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्यासाठी ते प्रशासनासोबत काम करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
यापूर्वीही झाला होता अपघात
मेक्सिकोत अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मेक्सिकोमध्ये अशा प्रकारचे अपघात सातत्याने घडत आहेत. ऑक्टोबर 2024 मध्येही असाच एक अपघात झाला होता, ज्यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला होता. 2020 पासून देशात रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. 2022 मध्ये अशा घटनांमध्ये 4,803 लोकांचा मृत्य़ू 90 हजार लोक जखमी झाले आहेत.
भारतातही गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. दोन ते टॅंकरची जोरदार धडक झाल्याने मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात 40 लोक गंभीररित्या जखमी झाले होता आणि 5 जमांचा जागीच मृत्यू जाला होता.