बांगलादेशमध्ये शिजतोय भारताविरोधात कट; दहशतवादी हाफिज सईदच्या कुरघोड्या सुरुच (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
America Shutdown : अमेरिकेतील शटडाऊन लवकरच संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले उत्तर
गुप्तचर अहवालानुसार, बांगलादेशच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतावर गोळी चालवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहवालानुसार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी पाकिस्तानच्या खैरपूर तमीवाली येथे एक लष्करी सभा झाली होती. या लष्करी सभेच्या वरिष्ठ कमांडर सैफुल्लाह यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सैफुल्लाह उघडपणे, लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद भारताविरुद्धच्या कारवायांसाठी शांत बसणार नाही, तो बांगलादेशातून भारतावर हल्ल्याची तयारी करत असल्याचे म्हणताना दिसत आहे.
सैफुल्लाहने दावा केला आहे की, यापूर्वी देखील अनेक वेळा हाफिजने बांगलादेशातून ऑपरेशन सिंदूरला उत्तर देण्यासाठी नवी मोहिम सुरु केली होती. गुप्तचर अहवालानुसार, हाफिज एक जवळच्या नातेवाईकाकडे बांगलादेशता राहत आहे. येथे बांगलादेशाती युवकांना कट्ट्ररपंथी बनवण्याचे आणि जिहादच्या नावाखाली प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहे. बांगलादेशात एक मोठे दहशतवादी जाळे उभे केले जात असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
सैफुल्लाहने देखील लोकांना भारतविरोधी जिहाद करण्याचे उघडपणे आव्हान केले आहे. यामध्ये लहान मुलांचाही सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही काळात बांगलादेशात लष्कर-ए-तैयबाच्या लष्करी हालचाली दिसून आल्या आहेत. यामुळे भारतासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. हाफिज आणि सैफुल्लाह स्वत:ला इस्लामचा रक्षक समजत आहे.
सध्या ही परिस्थिती भारतासाठी अंत्यत धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तान आणि अमेरिका जवळ येत आहे, अशा परिस्थिती भारतासमोर एक मोठे आव्हाने आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या भारतीय सैन्य आणि सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत. सीमावर्ती भागांमध्ये बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. हाफिज सईदच्या हालचालींचा देखील आढावा घेतला जात आहे.






