तुर्कीत भीषण अपघात! उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान ; लष्करी प्रमुखांसह ८ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया/iStock)
टेक्सासच्या गॅल्वेस्टनमध्ये भीषण अपघात; मेक्सिकन नौदलाचे विमान लँडिंगदरम्यान कोसळले
मीडिया रिपोर्टनुसार, हे विमान तुर्कीचे फाल्कन ५० डिझाईनचे खाजगी बिझनेस जेट होते. या विमानाने अंकारातील एसेनबोगा विमानतळावरुन स्थानिक वेळेनुसार रात्री सुमारे ८.३० वाजता उड्डाण घेतले होते. हे खासगी जेट अल-हद्दाद लीबियाकडे निघाले होते. मात्र उड्डाणानंतर ४० मिनिटांनी विमानाचा अपघात झाला. विमानाचा एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. यापूर्वी पायलटने विमानात तांत्रिक बिघाड असल्याची अधिकाऱ्यांना सांगितले होते. इमरजन्सी लँडिंगचा सिग्नलही देण्यात आला होता. मात्र विमान लँड होत असताना अचाक रडारवरुन गायब झाले आणि विमानाचा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकारापासून ७० किलोमीटर अंतरावर दक्षिणेला हयमाना जिल्ह्यात एका छोट्या गावाजवळ विमानाचे अवशेष सापडले आहे. या दुर्घटनेची पुष्टी लीबियाचे पंतप्रधान अब्दुल-हामिदज दबीबा यांनी केली आहे. तसेच त्यांनी आर्फी चीफ जनरल यांच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला आहे, त्यांनी लीबियाचे आर्मी चीफ जनरल मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांचा मृत्यू हा लीबियासाठी मोठा धोका आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल-हद्दाद हे पश्चिन लीबियामदील अत्यंत प्रभावी लष्करी कमांडर होते. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीखाली सुरु असलेल्या लीबियाच्या लष्करी एकत्रिकरमात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या मृत्यूने तुर्की आणि लीबियाला मोठा धक्का बसला आहे. ते तुर्की-लीबिया संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी उच्चस्तरीय चर्चेसाठी तुर्कीच्या राजधानी अंकारा येथे आले होते. अंकारामध्ये अइसाताना त्यांनी तुर्कीचे संरक्षण मं६ी यासर गुलेर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या या अपघातामुळे लीबियावर राजकीय आणि लष्करी संकट कोसळले आहे. सध्या या अपघाताचा तपास सुरु करण्यात आला असून तपासानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Russia Aircraft Crash: रशियन विमानाचा आकाशातच झाला चक्काचूर; भयावह अपघाताचे दृश्य कॅमेरात कैद, VIDEO
Ans: तुर्कीतील विमान अपघातात लीबियाचे आर्मी चीफ जनरल मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद, ४ वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि ३ क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे.
Ans: तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग होणार होते यावेळी विमान अचानक कोसळले आणि अपघात घडला.






