'लॉबस्टर रोल, ग्रील्ड चिकन, क्रीम चीज आणि आईस्क्रीम'... जाणून घ्या ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर पाहुण्यांसाठीचा मेन्यू ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सोमवारी, 20 जानेवारी रोजी पूर्णतः सज्ज आहेत. शपथविधीनंतर कॅपिटलच्या स्टॅच्युरी हॉलमध्ये उद्घाटन स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यात विविध प्रकारच्या खास पाककृतींचा आस्वाद घेत पाहुण्यांचे स्वागत केले जाणार आहे.
उद्घाटन स्नेहभोजनाची परंपरा 1897 मध्ये अध्यक्ष विल्यम मॅककिन्ले यांच्या कार्यकाळात सुरू झाली. व्यवस्थेवरील सिनेट समितीने मॅककिन्ले यांच्या सन्मानार्थ रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. त्या दिवसापासून या परंपरेला सुरुवात झाली.1953 पासून, संयुक्त काँग्रेस समिती उद्घाटन स्नेहभोजनासाठी नियोजन करत आहे. या जेवणात प्रादेशिक वैशिष्ट्ये, देशाची खाद्य परंपरा आणि नव्या अध्यक्षांच्या वैयक्तिक आवडी प्रतिबिंबित होत असतात.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटन स्नेहभोजनासाठी 3 कोर्सचे जेवण तयार करण्यात आले आहे. यामध्ये सीफूड, मांस डिश आणि आइस्क्रीमचा समावेश असेल. लोकशाही परंपरेला आदरांजली म्हणून आयोजित या जेवणात उच्च दर्जाच्या आणि सांस्कृतिक खाद्यपदार्थांचा समावेश असेल. मेनूमध्ये लॉबस्टर रोल, ग्रील्ड चिकन, क्रीम चीज आणि काजू, ग्रॅव्हिल सूप, बार्बेक्यू सेव्हन हिल्स अँगस बीफ, चॉकलेट चिप कुकीज अशी आकर्षक आणि विविध प्रकारची पदार्थ असण्याची शक्यता आहे. या डिश ट्रम्प यांच्या आवडीच्या असण्यासोबतच, पाहुण्यांना एक अविस्मरणीय अनुभव देण्याचे ध्येय यामागे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हमासशी ‘मैत्री’ मान्य नाही! ‘या’ कारणामुळे नेतान्याहू यांचे सिंहासन होऊ लागले डळमळीत
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2017 मधील उद्घाटन स्नेहभोजनातही तीन कोर्सचे जेवण दिले गेले होते. 200 हून अधिक पाहुण्यांनी या लंचचा आस्वाद घेतला. मुख्य डिशमध्ये बार्बेक्यूड सेव्हन हिल्स एंगस बीफ, डार्क चॉकलेट, बटाटा ग्रॅटन आणि ज्यूससह मेन लॉबस्टर आणि गल्फ कोळंबी यांचा समावेश होता. याशिवाय, मिष्टान्नमध्ये चॉकलेट डेसर्ट्सनी पाहुण्यांची मने जिंकली होती. हे स्नेहभोजन नव्या अध्यायाची सुरुवात असल्याचा संदेश देणारे आणि परंपरांना उजाळा देणारे ठरले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चंद्रावर निर्माण झालाय मोठा धोका; जाणून घ्या कोणी दिला इशारा? WMF ची यादी धडकी भरवणारी
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष उद्घाटन स्नेहभोजन ही फक्त एक परंपरा नसून देशातील लोकशाही, सांस्कृतिक आणि खाद्य परंपरेचे प्रतीक मानली जाते. या जेवणात देशाच्या विविधता आणि एकात्मतेचे दर्शन घडते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या यंदाच्या लंचमध्येही हेच प्रतिबिंबित होईल, अशी अपेक्षा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2025 च्या उद्घाटन स्नेहभोजनाची थाटमाट आणि मेनूची खासियत पाहता, हे केवळ एक जेवण नसून लोकशाही परंपरेचा उत्सव ठरणार आहे. विविध प्रकारच्या पदार्थांनी परिपूर्ण हा सोहळा उपस्थित पाहुण्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरेल, यात शंका नाही.