पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणावर आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन; मलाला युसूफझाई उपस्थित, तालिबानने दिला नकार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणावर आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचा उद्देश मुस्लिमबहुल देशांतील नेते आणि शिक्षण मंत्र्यांना एकत्र आणणे आहे. परंतु अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला निमंत्रण दिले गेले असतानाही, त्यांनी या परिषदेपासून दूर राहणे पसंत केले. अफगाणिस्तान हा एकमेव देश आहे जिथे सध्या मुलींच्या शाळेत जाण्यास बंदी आहे. दरम्यान, मलाला युसूफझाई देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहे.
मलाला युसूफझाई राहणार उपस्थित
या परिषदेचे मुख्य आकर्षण म्हणजे नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझाई यांची उपस्थिती आहे. मलाला यांनी आपल्या मूळ देशात परत आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पाकिस्तानमध्ये परत आल्याने मला खूप सन्मान आणि आनंद होत आहे.” 2012 मध्ये तालिबानी हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारासाठी त्या ब्रिटनला गेल्यानंतर, ही त्यांची पाकिस्तानमधील तिसरी भेट आहे.
मुलींच्या शिक्षणासाठी जीवन समर्पित
मलाला यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. तालिबानने त्यांच्यावलर गोळी झाडून त्यांच्या स्वप्न संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु मलाला यांनी हार मानली नाही. उलट, त्यांनी आपल्या संघर्षातून जागतिक पातळीवर एक उदाहरण निर्माण केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आले. मलाला युसूफझाई आता मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांची जागतिक प्रवक्त्या बनल्या आहेत.
I am excited to join Muslim leaders from around the world for a critical conference on girls’ education. On Sunday, I will speak about protecting rights for all girls to go to school, and why leaders must hold the Taliban accountable for their crimes against Afghan women & girls. https://t.co/g2ymU4lTOw
— Malala Yousafzai (@Malala) January 9, 2025
शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना मलालाने लिहिले की, “मुलींच्या शिक्षणावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुस्लिम नेत्यांसोबत संवाद साधण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.” त्यांनी सांगितले की त्या रविवारी सर्व मुलींना शाळेत जाण्याचा हक्क मिळवून देण्याच्या विषयावर भाषण करेल. तसेच, त्या अफगाणिस्तानातील महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अन्यायासाठी तालिबानला जबाबदार धरण्याची गरज अधोरेखित करेल.
मोहम्मद अल-इस्सा यांचा पाठिंबा
पाकिस्तानच्या शिक्षणमंत्री खालिद मकबूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानला निमंत्रण देण्यात आले होते, मात्र, त्यांनी या परिषदेत सहभाग घेतला नाही. तर याचदरम्यान, सऊदी मौलवी आणि मुस्लिम वर्लड लीगचे महासचिव मोहम्मद अल-इस्सा यांनी या शिखर परिषदेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मुलींच्या शिक्षणाला धर्माच्या नावावर विरोधकरणारे लोक चुकीचे आहेत. संपूर्ण मुस्लिम लीग जग मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व मान्य करते.”
या परिषदेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणि तालिबानी अन्यायाविरोधातील आवाज जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मलालाचा संघर्ष आणि तिचे धाडस मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरले आहे.