Mosque Attack : सॅन डिएगो हादरलं! मशीदीबाहेर अंदाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू; हल्लेखोरांनी स्वत:लाही संपवले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Mexico Shooting : मेक्सिकोत गँगवॉरचा भडका! अंदाधुंद गोळीबारात एका चिमुकल्यासह १० ठार, परिसरात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी(१८ मे) दुपारच्य सुमारास नमाजच्या आधी ही घटना घडली. मशिदीत प्रार्थनेची तयारी सुरु होती. यावेळी अचानक गोळ्यांचा आवाज येऊ लागला. या अचानक झालेल्या हल्ल्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे मशिदीत उपस्थि लोकांचीही पळापळ झाली.
सॅन डिएगोच्या पोलिस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ तीन पुरुषांचे मृतदेह आढळले आहेत. यामध्ये एका सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे हल्लेखोरांना मशिदीत जाता आले नाही. यामुळे मोठा नरसंहार टळला. सुरक्षा रक्षकांनी तातडीने मशिदीच्या आवारात सुरु असलेल्या डे-स्कूलमधील सर्व मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढले असून सर्व मुले सुखरुप आहेत.
या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात नाकेंबद करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी काही अंतरावर एक संशयास्पद कार आढळली. यामध्ये एक १७ वर्षी आणि एक १९ वर्षीय अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळले. या दोघांनीच मशिदीवर हल्ला केला होता. यानंतर कारमध्ये येऊन स्वत:ला संपवले. याच वेळी जवळच काम करणाऱ्या एका माळ्यावरही गोळीबार झाला होता.
सध्या या घटनेचा तपास एफबीआयने सुरु केला आहे. हल्लेखोरांच्या वैयक्तिक आयुष्याची पार्श्वभूमीवर तपासली जात आहे. या हल्ल्यामागचा हेतू अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने अमेरिकेतील मुस्लिम समुदायात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अमेरिकेच्या साल्ट लेक सिटीच्या चर्चबाहेर अंदाधुंद गोळीबार ; हल्ल्यात २ जणांचा मत्यू, ५ हून अधिक जखमी
Ans: अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात सॅन डिएगो काऊंटीमध्ये एका मशिदीबाहेर अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे.
Ans: सॅन डिएगो काऊंटीत मशिदीबाहेर झालेल्या हल्ल्यात एका सुरक्षा रक्षकासह ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Ans: सॅन डिएगो काऊंटीत मशिदीबाहेर झालेल्या हल्ल्यामागचा हेतू अद्याप अस्पष्ट आहे. परंतु हा हल्ला द्वेषातून झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






