Mexico Shooting : मेक्सिकोत गँगवॉरचा भडका! अंदाधुंद गोळीबारात एका चिमुकल्यासह १० ठार, परिसरात खळबळ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मेक्सिकोत ट्रम्पविरोधात नागरिकांचा संताप अनावर; ‘Burning of Judas’ मध्ये प्रतिमा जळून खाक, VIDEO
पुएल्बाच्या स्थानिक सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात बंदुकधारकांनी अचानक एका रहिवासी भागावर गोळीबार (Firing) करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात ६ पुरुष, ३ महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे गोळीबार केला. यामुळे संपूर्ण परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.
सध्या या हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट असून हा हल्ला स्थानिक ड्रग कार्टेल किंवा गुन्हेगारी टोळ्यांमधील अंतर्गत वादातून झाला असण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे. फेडरल एजन्सी आणि सुरक्षा दल सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या भीषण हल्ल्यानंतर मध्य मेक्सिकोतील नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका केली आहे. गँगवॉरच्या वाढत्या धोक्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. भीतीपोटी नागरिकांनी पलायन केले असून आतापर्यंत सुमारे ८०० ते १००० कुटुंबानी आपली घरे आणि मालमत्ता सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे.
सरकारकडून सुरक्षेचे कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप आणि असंतोषाचे वातावरण आहे. पुएब्लाचे गव्हर्नर अलेजांड्रो यांनी देखील या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गेल्या काही महिन्यात मेक्सिकोच्या पुएब्ला प्रांतात हिंसेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हुहुएलतान एल ग्रांडे शहरात अशाच्या एका घटनेत ६ जणांची हत्या करण्यात आली होती. तसेच आणखी एका हल्ल्यात ३ जणांचा बळी गेला होता. मेक्सिकोतील वाढता हिंचासार आणि निरापराध नागरिकांवरील हल्ले जागतिक स्तरावर चिंतेचे कारण बनले आहेत. स्थानिक पोलिस आरोपींचा शोध घेण्यात अपयशी ठरले असून सध्या या घटनांवर आता तपास यंत्रणा काम करत आहे.
Mexico Shooting : मेक्सिकोत मृत्यूचे तांडव! फुटबॉल मैदानावर अंदाधुंद गोळीबारात ११ ठार, अनेक जखमी
Ans: मेक्सिकोच्या पुएल्बा प्रांतात रविवारी (१७ मे) तेहुउइत्झिंगो शहरात अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे.
Ans: या गोळीबारात एका निषप्पाप मुलासह १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात ६ पुरुष, ३ महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.
Ans: या हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट असून हा हल्ला स्थानिक ड्रग कार्टेल किंवा गुन्हेगारी टोळ्यांमधील अंतर्गत वादातून झाला असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.






