Middle East Conflict : ट्रम्प यांनी इराणवरील लष्करी हल्ला तुर्तास रोखला; शांतात चर्चेसाठी दिली संधी, युद्ध थांबणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल मीडिया अकाऊंटवर या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, कतार, सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि यूएई या आखाती मित्रराष्ट्रांनी अमेरिकेला इराणवर लष्करी कारवाई न करण्याची आग्रहाची विनंती केली होती. यामुळे इराणवरील हल्ला काही काळासाठी रोखला जात आहे. सध्या इराणशी पडद्यामागे सकारात्म आणि अत्यंत गंभीर चर्चा सुरु आहे. थेट हल्ला झाल्यास परिस्थिती बिघडू शकते. अशी या देशांनी भीती व्यक्त केली होती.
परंतु इराणवरील हल्ला तुर्तास टळला असला तरी ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, या शांतता चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही तर, अमेरिका (America) इराणवर पूर्ण ताकदीने हल्ला करेल. अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून कतार, सौदी आणि युएई(UAE) वर इराण वारंवार हल्ले करत आहे. या देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले जात होते. परंतु इराणने या देशांच्या महत्त्वपूर्ण उर्जा केंद्र आणि पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले. यामुळे आपल्या नागरिकांच्या आणि उर्जा सुरक्षेसाठी या तिन्ही देशांनी पुढाकार घेऊन अमेरिकेला हल्ला रोखण्याची विनंती केली.
या संपूर्ण वादात पाकिस्तान अमेरिका-इराणमध्ये मध्यस्थी म्हणून कार्य करत आहे. पाकिस्तानने मे महिन्याच्या सुरुवातील इराणचा १४ कलमी प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडला होता. परंतु याला ट्रम्प यांनी धुडकावून लावले होते. परंतु दोन्ही देशांतील वाद इराणच्या युरेनियम संवर्धन आणि अण्वस्त्र साठ्यांवरुन कायम आहे. शिवाय ट्रम्प सतत इराणला हल्ल्याचा इशारा देत आहेत. सध्या इराण (Iran) यावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Ans: कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती देशांनी केलेल्या विशेष आवाहानानंतर इराणवरील लष्करी हल्ला तात्पुरता थांबवण्यात आला असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Ans: इराणला त्यांचा समृद्ध युरेनियमचा साठा अमेरिकेकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच इराणने अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे थांबवावा असेही अमेरिकेने म्हटले आहे. मात्र, इराणने याला स्पष्टपणे नकार दिला आहे. यामुळे दोन्ही देशांतील वाद अधिक पेटला आहे.






