काठमांडू : नेपाळ आणि चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला पूर आला आहे. यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जण बेपत्ता झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचाव आणि मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बेपत्ता झालेल्या नागरिकांमध्ये १२ नेपाळी आणि ६ चिनी नागरिकांचा समावेश आगे. यामध्ये ३ पोलिस कर्मचारी देखील आहेत.
तसेच नेपाळ आणि चीनला जोडणार मुख्य पूल मितेरी ब्रिज देखील पुरात कोसळला आहे. यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. या मीटारी ब्रिजवरुन चीन आणि नेपाळमध्ये लाखो रुपयांचा व्यापार होतो. नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील सरुवागढी सीमावर्तीत भागामध्ये ही घटना घडली आहे.
याशिवाय पूरामध्ये रसुवाच्या कस्टम कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. कस्टम कार्यालयाचे मालवाहू कंटेनर पुरात वाहून गेले आहेत. सध्या पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने बचाव पथकाच्या कार्यात अडथळा येत आहे.
भोटोकोशी नदीतील पुराममुळे नेपाळ आणि चीनला मोठा धक्का बसला आहे. यामुळे नेपाळच्या मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मीटारी ब्रिज वाहून गेल्याने नेपाळ आणि चीनमधील व्यापार थांबला आहे. नेपाळाचा बहुतांश व्यापरा हा भारतातून होता. परंतु नेपाळला भारतातून माल चीन मार्गे आयात करावा लागतो. मात्र पूल कोसळल्या मुळे नेपाळला भारतातून माल आयात करण्यात अडथळ निर्माण झाले आहे.
नेपाळच्या सशस्त्र दलाने दिलेल्या माहितीनुसार, भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे तिमुरे भागातील ईव्ही चार्जिंग स्टेशनवरील वाहने देखील वाहून गेली आहे. तसेच नेपाळच्या पासांग ल्हामू महामार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामुळे वाहतूक सेवा देखील ठप्प झाले आहे. चीनमधून आयात होणाऱ्या वस्तू पूरात वाहून गेल्या आहेत.
याशिवाय रसुवा येथील जलविद्युत प्रकल्पाचेही नुकसान झाल्याचे नेपाळने म्हटले आहे. यामुळे २०० मेगावॅट पर्यंतच्या वीज निर्मितीचे कार्य ठप्प झाले आहे. चिलीम जलविद्युत कंपनीच्या भोटेकोशी आणि त्रिशुली कॉरिडॉर प्रकल्पालाही फटका बसला आहे. सध्या नेपाळमध्ये रसुवामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पुरामुळे येथे लोकांच्या जीवनात अडथळे निर्माण होत आहे. गेल्या वर्षी नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे भुस्खलन झाले होते. यामध्ये २१५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.