इराणला मोठा झटका! रशिया-चीनने फिरवली पाठ? भारतानेही कंबर कसली, UNSC मध्ये नेमकं काय घडलं? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणच्या मध्यपूर्वेतील आखाती देशांवरील हल्ल्यांच्या निषेधार्त ठराव मांडण्यात आला होता. बहीरनने सादर केलेल्या या ठरवाला तातडीने थांबवण्याचे आणि प्रादेशिक शांतता पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनने संयुक्त राष्ट्रांनी केले आहे. या ठरावात बहरीन, ओमान, कुवैत, सौदी अरेबिया, जॉर्डन, आणि यूएईच्या सार्वभौत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन इराणने केले असल्याचे म्हटले आहे. इराणने या देशांच्या पायाभूत आणि नागरी सुविधांना लक्ष्य करुन जागतिक शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण केली असल्याचे नमूद केले आहे.
या प्रस्ताववार इराणच्या मित्र राष्ट्रांनी मौन पाळले आहे. इराणच्या संरक्षणासाठी रशिया (Russia) आणि चीन(China) ने आपल्या व्हीटो अधिकाराचा वापर केलेला नाही. तसेच यासाठी मतदानही केले नाही. यामुळे इराणला मिळणारे कूटनीतिक संरक्षण संपुष्टात आले आहे. रशियाने यापूर्वी एक गुप्त प्रस्ताव मांडला होता, मात्र अमेरिकेने तो फेटाळून लावला आहे.
याच वेळी भारताने केवळ या ठरावाचे समर्थन केले नाही तर को-स्पॉन्सर करणाऱ्या १३५ देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. भारताने आखाती प्रदेशात शांतता आणि तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असल्याचे म्हटले आहे. या पावलामुळे भारताची प्रादेशिक स्थिरतेसाठी असलेली भूमिका स्पष्ट झाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तान(Pakistan) ने देखील इराणविरोधात मतदान केले आहे. इराणच्या हल्ल्यांमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांचा बळी गेल्याने पाकिस्तानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहेत. पाकिस्तानी नागरिकही सध्या भीती आणि असुरक्षिततेत आहेत. तर युरोपीय देश फ्रान्स(France) नेही मध्यपूर्वेतील संघर्षासाठी इराणला जबाबादर धरत अणु धोक्यांबाबात आणि आक्रमक कारवायांबाबात तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
इराण या ठरावाच्या मंजुरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षा परिषदेच्या व्यासपाठीचा गैरवापर इतरांनी केले असल्याचे म्हटले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय समुदाय यापुढे लष्करी तणाव आणि हिंसाचार सहन करणार नाही हे इराणविरोधात पडलेल्या १३ मतांवरुन स्पष्ट होत आहे.
Strait of Hormuz: भारताच्या ‘त्या’ जहाजांचा विषय काय? Iran ने फेटाळला दावा; होर्मुझमध्ये झाला गेम?
Ans: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणने आखाती देशांवर केलेल्या मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांचा निषेध करणारा कडक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावात इराणने तात्काळ हल्ले थांबवून क्षेत्रात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Ans: संयुक्त राष्ट्रातील इराणविरोधीत प्रस्तावला रशिया-चीनने पाठिंबा दिलेला नाही, परंतु विरोधही केले नाही
Ans: भारताने या प्रस्तावाला केवळ समर्थनच दिले नाही तर तो सह-प्रायोजक देशांमध्येही सहभागी झाला आहे. आखाती देशांमध्ये स्थिरता राखणे आणि तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्या दिल्याचे भारताने म्हटले आहे.






