बीजिंग: जगभरातील मोठं सैनबळ असलेल्या देशात गणल्या जाणारा चीन (China) सध्या चर्चेत आहे. आधीच कोरोनामुळे गेल्या दोन-तीन वर्षापासून चर्चेत असलेला चीन कोणत्या नव्या आजार किंवा विषाणूमुळे चर्चेत नसून त्यांच्या देशातील अंतर्गत घडामोडीमुळे सध्या चर्चेत आहे. चिनी लष्करात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. लष्करातील ९ वरिष्ठ जनरल बडतर्फ करण्यात आले आहेत. यात रॉकेट फोर्सच्या ३ कमांडर्सचा समावेश आहे. या घटेननं जगभरातील देशाचं चीनकडे लक्ष वेधलं गेलं आहे. नेमकं काय घडलंय जाणून घ्या.
[read_also content=”थर्टीफर्स्टच्या आधीच ठाण्यात सेलेब्रेशन, पोलिसांनी उधळली रेव्ह पार्टी, अंमली पदार्थांचा वापर, 100 जणांवर कारवाई! https://www.navarashtra.com/maharashtra/thane-police-took-action-on-rave-party-amid-31st-december-celebration-nrps-493716.html”]
चिनी सैन्यातील बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून निलंबनाच्या कारवाया सुरू आहेत. लष्करात मोठे बदल केले जात आहेत. गेल्या काही दिवसांत चिनी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात बडतर्फीची कारवाई करण्यात आली. यामध्ये रॉकेट फोर्सच्या तीन टॉप कमांडर्सचा समावेश आहे. अण्वस्त्र विभागाचं कामकाज त्यांच्याकडे होतं. लष्करी उपकरणांच्या खरेदीसाठी आणि विकासासाठी अब्जावधी डॉलरचा खर्च केला जात आहे.