फोटो सौजन्य: iStock
नवी दिल्ली: ओमानच्या सागरी किनारपट्टीवर तेलवाहू जहाज कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. किनारपट्टीवर तेलवाहू जहाज बुडाल्याची माहिती समोर आली आहे. एकूम 16 लोक बेपत्ता झाले असून यामध्ये 13 भारतीयांसह 3 लोकांचा क्रू मेंबर्सचा समावेश आहे. इतर 3 क्रू मेंबर्स श्रीलंकेचे नागरिक आहेत. अद्याप बेपत्ता झालेले 13 भारतीय व इतर क्रू मेंबर्सचा शोध लागलेला नाही.
सागरी सुरक्षा दलाकडून मंगळवारी (16 जुलै) ही माहिती दिली गेली. ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने म्हण्यानुसार, ही घटना सोमवारी (दि. 15) घडली. कोमोरोस-ध्वज असलेला तेलवाहू जहाज ड्यूकम बंदर शहराजवळ कोसळले.
ड्यूकम बंदर ओमानच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर स्थित आहे. जे ओमानच्या प्रमुख तेल आणि वायू खाण प्रकल्पांच्या जवळ आहे. या ठिकाणी मोठ्या तेल शुद्धीकरणाचा काम केले जाते. हा दुक्मच्या विशाल औद्योगिक क्षेत्राचा एक भाग आहे. हा ओमानचा सर्वात मोठा आर्थिक प्रकल्प आहे.
A Comoros flagged oil tanker capsized 25 NM southeast of Ras Madrakah. SAR Ops initiated with the relevant authorities. #MaritimeSecurityCentre
— مركز الأمن البحري| MARITIME SECURITY CENTRE (@OMAN_MSC) July 15, 2024
बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे
या जहाजाची ओळख प्रेस्टिज फाल्कन अशी करण्यात आली आहे. एमएससीने सांगितले की जहाजातील कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे. शोधादरम्यान असे सांगण्यात आले की “जहाजातील चालक दलाचे सदस्य अद्याप बेपत्ता आहेत.” शिपिंग डेटानुसार हे जहाज 2007 मध्ये बांधलेले 117 मीटर लांब तेल उत्पादनाचा टँकर आहे. शिपिंग वेबसाइट marinetraffic.com नुसार, तेल टँकर येमेनच्या बंदर शहर एडनच्या दिशेने निघाला होता.