भारतानं घरात घुसून मारलं! आता पाकिस्तानी मृतदेह नेण्यासाठी करताय धावाधाव; पाहा VIDEO (फोटो सौजन्य-X)
Operation Sindoor News in Marathi : पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यासाठी ९ दहशतवादी तळांवर मोठा हवाई हल्ला केला आहे. बुधवारी रात्री १.३० वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे हल्ले करून भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी घटनेचा बदला घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत, भारताने ज्या सर्व दहशतवादी तळांवरून हल्ले करण्याचे नियोजन केले जात होते आणि दहशतवादी घटना घडवून आणल्या जात होत्या ते सर्व दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
ट्रैक्टर में डाल कर तो लाशें ले जा रहे हो
और ढींगे मारोगे , भारत को जितने की pic.twitter.com/wgJICbwxv2
— Laxmikant bhardwaj (@lkantbhardwaj) May 7, 2025
यामध्ये, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय ‘मरकज सुभान अल्लाह’ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. हे जैशचे ऑपरेशनल हेडक्वार्टर होते जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. बहावलपूरमधील या प्रशिक्षण केंद्रावर काल रात्री झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानचे इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) संचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, भारताने हल्ला करून २४ क्षेपणास्त्रे डागली आहेत, ज्यामध्ये शेकडो दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर, अनेक ठिकाणांहून मृतदेह वाहून नेण्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तुम्ही मृतदेह कसे वाहून नेले जात आहेत ते पाहू शकता.
रुझान आना शुरू हो गए मित्रों 🔥
नाम : आतंकवादी याकूब मुगल,बिलाल टेरर ग्रुप पाकिस्तान का मुखिया ।
पाकिस्तान पुलिस के लोग भी शामिल । pic.twitter.com/gYz32meiAS— खुरपेंच (@khurpenchh) May 7, 2025
आज ७ मे रोजी दुपारी १:४४ वाजता सुरक्षा दलांनी पीओके आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. आतापर्यंत या कारवाईत ९० ते १०० दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला जात आहे. मुर्डिकेमध्ये ३० दहशतवादी मारले गेले, तर इतर ठिकाणीही अनेक दहशतवादी मारले गेले.