पाकिस्तानमध्ये वातावरण तापले! इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या? (Photo Credit - X)
🚨#BreakingNews:
A credible source from Pakistan has confirmed to Afghanistan Times that PTI Chairman Imran Khan has allegedly been mysteriously killed, and his body has been moved out of the prison.#PTI #AfghanistanAndPakistan pic.twitter.com/FpJSrksXHA — Afghanistan Times (@TimesAFg1) November 26, 2025
बहिणींवर लाठीमार, भेट नाकारली
इम्रान खान यांच्या तीन बहिणी, नूरीन खान, अलीमा खान आणि उज्मा खान यांनी धक्कादायक दावा केला आहे की, त्यांना गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्या भावाला भेटू दिलेले नाही. जेव्हा त्यांनी भेटीची मागणी केली, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर क्रूरपणे लाठीमार केला. बहिणींनी पोलिसांच्या मारहाणीचा आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने (PTI) म्हटले आहे की, त्यांच्या समर्थकांवर आणि बहिणींवर पोलिसांनी अकारण हल्ला केला. पक्षाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
🚨 Afghan media claims Imran Khan has been killed in prison… Pakistan denies it! But his family & PTI supporters still aren’t allowed to meet him, sparking midnight protests outside Adiala Jail If he’s safe… why the blackout? https://t.co/Sn556tPSjE pic.twitter.com/Qb5WQUDm2O — Nabila Jamal (@nabilajamal_) November 26, 2025
७१ वर्षांच्या बहिणीला केस पकडून फरफटले
इम्रान खान यांच्या बहिणींनी पंजाब पोलीस प्रमुख उस्मान अन्वर यांना पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी आणि समर्थकांनी कोणत्याही चिथावणीशिवाय शांततापूर्ण आंदोलन करत असताना पोलिसांनी क्रूरपणे मारहाण केल्याचे म्हटले आहे. नूरीन नियाजी यांनी पत्रात म्हटले आहे, की “आम्ही इम्रान खान यांच्या तब्येतीबद्दल चिंतेत होतो, म्हणून आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत होतो. आम्ही कोणताही रस्ता अडवला नाही किंवा सार्वजनिक गैरसोय केली नाही. तरीही पोलिसांनी आमच्या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ७१ वर्षांच्या मला केस पकडून फरफटवण्यात आले आणि मला जखमा झाल्या आहेत.”
वकीलही भेटू शकले नाहीत
इम्रान खान यांच्या वकिलांनीही त्यांच्या अशिलांना भेटता येत नसल्याची तक्रार केली आहे. वकील खालिद युसूफ चौधरी यांनी सांगितले की, त्यांची इम्रान खान यांच्याशी भेट झालेली नाही आणि त्यांच्यापर्यंत आवश्यक वस्तूही पोहोचू दिल्या जात नाहीत.
वाढत्या शंका
अफगाणिस्तानच्या माध्यमांमध्येही इम्रान खान यांच्या हत्येच्या शक्यतेबद्दल बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आतापर्यंत पाकिस्तान सरकार, लष्कर किंवा जेल प्रशासनाकडून याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी झालेले नाही. परंतु पाकिस्तानी माध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे आणि इम्रान खान जिवंत असल्याचे म्हटले आहे. पण सरकारी मौनामुळे, इम्रान खान यांची प्रकृती कशी आहे आणि ते जीवित आहेत की नाहीत याबद्दलच्या शंका पाकिस्तानच्या राजकारणात अधिक गडद होत आहेत.
हे देखील वाचा: आता Imran Khan ची बहीण अलिमा खानचीही पाकिस्तानला अडचण, दिले अटकेचे आदेश






