Hormuz Strait: 'ट्रम्पचे आदेश नाही मानणार' १० हजार सैनिकांच्या डोळ्यांदेखत ५ Blacklisted ships पसार; 'US Navy'ची जगात नाचक्की ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा पुन्हा एकदा इस्लामाबादमध्ये होईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, इराणी शिष्टमंडळाचे सदस्य प्राध्यापक मोहम्मद मरांडी यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. इस्लामाबादमध्ये अमेरिकेसोबत झालेल्या अनिर्णित शांतता चर्चेनंतर, तेहरानला परतणाऱ्या इराणी शिष्टमंडळाला गंभीर सुरक्षा धोक्यांचा सामना करावा लागला.
इराणी राजकीय विश्लेषक मोहम्मद मरांडी यांनी स्पष्ट केले की, अत्यंत सावधगिरीचा उपाय म्हणून इराणी परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि संसद अध्यक्ष मोहम्मद-बाकेर गालिबाफ यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने प्रवासातच विमान बदलले. शिष्टमंडळाने तेहरानला जाण्यासाठी बस आणि ट्रेनचा पर्यायी मार्गही निवडला. इराणी शिष्टमंडळासोबत इस्लामाबादला गेलेल्या तेहरान विद्यापीठाचे प्राध्यापक मरांडी यांनी सांगितले की, इस्लामाबादला जात असताना त्यांच्या विमानावर हल्ला होऊ शकतो, अशी थेट धमकी त्यांना मिळाली. प्राध्यापक मरांडी यांनी खुलासा केला की, याच कारणामुळे तेहरानला परतताना शिष्टमंडळाने गुप्तपणे आपले विमान बदलले.
मरांडी म्हणाले की, आमचा अमेरिकेवर विश्वास नाही आणि आम्ही युद्धाच्या पुढील फेरीच्या तयारीत खूप व्यस्त आहोत. अमेरिका कपटी आहे हे इराणला नेहमीच माहीत आहे. राजनैतिक स्तरावर वाटाघाटी करत असताना इराणी राजवट आपली लष्करी क्षमता मजबूत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या सगळ्या घडामोडींचा पुढील चर्चेच्या फेरीवर काय परिणाम होतो ते पाहावे लागणार आहे.
चर्चेची पुढील फेरी लवकरच होणार
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही म्हटले आहे की, पुढील दोन दिवसांत पाकिस्तानात शांतता चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी चर्चा पुन्हा सुरू झाल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. दोन्ही देशांचे वाटाघाटी करणारे संघ या आठवड्याच्या अखेरीस पाकिस्तानात परत येऊ शकतात. सूत्रांनुसार, इस्लामाबादला परत येऊन चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी वॉशिंग्टन आणि तेहरानला प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. तथापि, अद्याप कोणतीही विशिष्ट तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.






