Pakistan Abdali missile test : भारतातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दबावाखाली आलेल्या पाकिस्तानने ‘अब्दाली’ या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. मात्र ही चाचणी लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन न ठरता जगाच्या आणि भारताच्या दृष्टिकोनातून एक विनोदी प्रयत्न ठरत आहे. कारण फक्त ४५० किलोमीटर पल्ला असलेले हे क्षेपणास्त्र, जर लाहोरहून सोडले गेले तर ते फक्त इस्लामाबादपर्यंतच पोहोचू शकते – म्हणजे स्वतःच्या देशातच ‘प्रहार’ करण्याची क्षमता!
पाकिस्तानने शनिवारी ‘सिंधू सराव’ या लष्करी मोहिमेअंतर्गत जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी केली. ही चाचणी करताना पाकिस्तानचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लष्करप्रमुख तसेच शास्त्रज्ञांनी जल्लोष साजरा केला. या क्षेपणास्त्राचे आर्मी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रक्षेपण करण्यात आले.
पण वास्तविकतेकडे पाहता, अब्दाली क्षेपणास्त्राचे सामरिक महत्त्व जवळपास ‘शून्य’ आहे. याची कमाल मारक क्षमता फक्त ४५० किमी असल्याने ते लाहोरहून दिल्लीपर्यंत तर दूरच, पेशावरपर्यंतही पोहोचू शकत नाही. लाहोर ते पेशावरचे अंतरच ५२१ किमी आहे, तर इस्लामाबाद फक्त ३७८ किमी अंतरावर आहे. त्यामुळे या क्षेपणास्त्राची अचूक लष्करी उपयुक्तता फारच मर्यादित ठरते.
भारताच्या क्षेपणास्त्र शक्तीसमोर पाकिस्तानचा प्रयत्न नगण्य
भारताकडे पृथ्वी-२, अग्नि मालिका आणि ब्रह्मोससारखी आधुनिक क्षेपणास्त्रे आहेत. विशेषतः ब्रह्मोस हे मॅक ३ वेगाने धावणारे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र असून, त्याची रेंज ८०० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, अग्नि-५ क्षेपणास्त्र ५,००० किमी पेक्षा जास्त अंतरावर मारा करू शकते. अशा वेळी, पाकिस्तानचे अब्दाली हे तांत्रिकदृष्ट्या जुनाट, असुरक्षित आणि मर्यादित परिणामकारकता असलेले क्षेपणास्त्र असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S-400 डेटा लीकचा संभाव्य धोका; पाकिस्तान-चीन गुप्त करारामुळे भारताची चिंता वाढली
हल्ल्यानंतर दबावाखाली पाकिस्तान, क्षेपणास्त्र चाचणी म्हणजे फसवणूक
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर थेट आरोप केल्यानंतर, इस्लामाबादवर जागतिक स्तरावर दबाव निर्माण झाला आहे. अशा वेळी ‘अब्दाली’ चाचणी केवळ आंतरिक अस्थिरता आणि लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसते. पाक लष्कर आणि सरकारने ही चाचणी मोठ्या यशाची घोषणा केली असली तरी, तज्ज्ञांच्या मते हे केवळ खोटे आत्मसंतोषाचे आणि आत्मघाती समाधानाचे चित्र आहे.
जागतिक माध्यमांकडूनही दुर्लक्ष, सामरिक दृष्टिकोनातून क्षुल्लक घटना
या चाचणीची आंतरराष्ट्रीय माध्यमांनी फारशी नोंद घेतलेली नाही, कारण अब्दाली क्षेपणास्त्राचे कोणतेही धोरणात्मक महत्त्व नाही. ही चाचणी पाकिस्तानच्या लष्करी विश्वासार्हतेत कोणताही भर घालत नाही. भारत जिथे ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संरक्षण व अवकाश क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे, तेथे पाकिस्तान अजूनही पुरातन क्षेपणास्त्रांवर गर्व करत आहे, हेच यामुळे अधोरेखित होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Army Chief: भारताचा स्पष्ट संदेश, सहनशक्ती संपली! पाक लष्करप्रमुख असीम मुनीर मात्र चिंतेत
अब्दाली क्षेपणास्त्र म्हणजे पाकिस्तानच्या असुरक्षिततेचे प्रातिनिधिक रूप
या संपूर्ण घटनाक्रमातून स्पष्ट होते की पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेचा आत्मविश्वास खूपच डळमळीत आहे. अब्दालीसारखे क्षेपणास्त्र, जे केवळ देशांतर्गत अंतर पार करू शकते, हे भारतासारख्या शेजारी प्रबळ राष्ट्रापुढे कोणताही धोका निर्माण करू शकत नाही. फक्त लष्करी ‘दाखवा’साठी केलेली ही चाचणी पाकिस्तानच्या राजकीय आणि सामरिक असमर्थतेचे एक स्पष्ट लक्षण आहे – आणि जागतिक स्तरावर त्यांची थट्टाच उडवते, आदर नव्हे.