Modi-Putin Friendship : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे! पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन द्विपक्षीय बैठकीला एकाच गाडीतून, PHOTO VIRAL (फोटो सौजन्य: एक्स/@narendramodi)
PM Modia and Putin Meeting : बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी चीनच्या तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना (SCO) परिषदेत आपली उपस्थित दर्शवली होती. या परिषदेत जगातील १० देशांचे नेते उपस्थित होते. यावेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) ही उपस्थित होते. दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक पार पडली आहे. सध्या यावेळी बैठकीला जाताना दोघेही एकाच गाडीतून गेले होते.
याचा फोटो नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दृश्याला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवॉरदरम्यान ही भेट भारत रशियासाठी खूप महत्वाची मानली जात आहे. पंतप्रधान मोदींनी हा फोटो शेअर करताना लिहिले की,
SCO शिखर परिषदेनंतर, अध्यक्ष पुतिन आणि मी आमच्या द्विपक्षीय बैठकीला जाताना एकत्र गेलो. पुतिनशी झालेली चर्चा नेहमीच प्रेरणादायी असते.
सोव्हिएत काळापासून भारत आणि रशियाचे संबंध अधिक मजबूत आहेत. गेल्या अनेक काळापासून दोन्ही देशांनी आपल्या व्यापारी, तंत्रज्ञान आणि राजनैतिक अशा क्षेत्रांमध्ये संबंध दृढ केले आहे. पंतप्रधान मोदींनी शेअर केलेल्या या फोटोमुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांतील संबंध अधोरेखित झाले आहेत. शिवाय पंतुप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांचीही मैत्री गेल्या अनेक वर्षांपासून चांगली दृढ झाली आहे.
Modi-Xi-Putin त्रिकुटाची जगभरात चर्चा; अमेरिकेनेही बदललेले सूर, म्हणाले भारत हा 21 व्या शतकापासून…
मात्र या भेटीमूळे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना नक्कीच मिर्ची लागली असणार आहे. सध्या अमेरिकेने भारतावर ५०% टॅरिफ लागू केले आहे. रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्रम्पच्या मते, भारत रशियाला युक्रेनविरुद्ध आर्थिक मदत करत आहे. यामुळे त्यांनी भारतावर टॅरिफ लादले आहे. असे करुन त्यांना विश्वास आहे की, पुतिन युद्ध थांबवण्यास तयार होतील, मात्र याचा उलट परिणाम झाला आहे. युद्ध अजूनही सुरु आहे. तर भारताने रशियाशी व्यापार सुरुच ठेवला आहे. यामुळे भारत आणि अमेरिका संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय चर्चेदरम्यान भारत आणि रशियामधील संबंधावर चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना भारत भेटीचेही आमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आहे, हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. तसेच दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितले कीस, दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठकीदरम्यान अनेक विषयांवर आदान-प्रदान करण्यात आले.
After the proceedings at the SCO Summit venue, President Putin and I travelled together to the venue of our bilateral meeting. Conversations with him are always insightful. pic.twitter.com/oYZVGDLxtc
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2025
चीनमधील या SCO परिषदेदरम्यान जगातील १० शक्तिशाली देशांनी एकत्रित निवेदन जारी करत दहशतवादाला निषेध केला आहेत. तसेच सर्व देशांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी शुल्क धोरणाविरोधात ठाम भूमिका घेतली.