नवी दिल्ली : भारताच्या नौदलाची शक्ती आता आणखी बळकट होणार आहे. कारण भारतीय नौदलाच्या ताफ्यात एक असे धोकादायक शस्त्र सामील होणार आहे, ज्याने भल्या भल्या देशांची झोप उडेल. या शस्त्राची रेंज आणि त्याची शक्ती भारताच्या शत्रूला गिळंकृत करुन टाकेल. मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि रशियामध्ये एक मोठा संरक्षण करार करण्यात आला आहे. या अंतर्गत भारताला रशियाकडून अत्याधुनिक अकुला क्लास अणु पाणबुडी मिळणार आहे. यामुळे आता पाकिस्तान आणि चीन सारख्या शत्रू देश घाबरुन राहतील.
या करारांतर्गत भारताला २०२८ पर्यंत रशियाकडून अणु पाणबुडी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी भारतीय नौदलाने तयारी सुरु केली आहे. खरं तरं ही या पाणबुडीची डिलिव्हरी भारताला २०२५ पर्यंत मिळणार होती, परंतु काही अडचणींमुळे ही डिलिव्हरी २०२८ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. २०१९ मध्ये रशिया आणि भारतामध्ये सुमारे ३ अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला होता. या कारारांतर्गत भारताला ही अणु पाणबुडी मिळणार होती. ही पाणीबुडी भारतीय नौदलात सामील झाल्यावर याचे नाव INS चक्र -३ असे ठेवले जाईल.
मात्र नव्या रशियाच्या अणु पाणबुडीमुळे भारताच्या नौदलाची ताकत अत्यंत वाढली आहे. तसेच या वर्षी भारताने अनेक मोठ्या संरक्षण करारांवर स्वाक्षरी केली आहे. सध्या भारताने संरक्षण निर्यात दरात १२ टक्क्याने वाढ केली आहे. भारत हा केवळ जागतिक संरक्षण क्षेत्रात ग्राहकच नव्हे तर निर्यातदारही बनला आहे.