'हमासला दहशतवादी घोषित करा' ; LeT चा हवाला देत इस्रायलची भारताकडे मागणी, प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
एएनआय ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना ही विनंती केली आहे. अधिकाऱ्याने म्हटले आहे की, आम्ही भारताला हमास आणि त्याच्याशी संबंधित सर्व संघटनांवर बंदी घालण्यासाठी आणि त्यांना दहशतवादी घोषित करण्याची विनंती करतो. इस्रायलने काही वर्षांपूर्वी पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. आता इस्रायलने भारताकडे तसेच करण्याची विनंती केली आहे.
याशिवाय इस्रायलच्या अधिकाऱ्याने दावा केला आहे की, हमास आणि लष्कर-ए-तैयबा एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. तसेच इराणी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स, हमास आणि हिजबुल्लाह संघटना देशभरात दहशतवादी नेटवर्क तयार करत असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हमास युरोपमध्ये गुन्हेगारी गट, ड्रग्ज माफिया, मानवी तस्करी आणि इतर गंभीर गुन्हांमध्ये सामील आहे. हे लोक आपले नेटवर्क वाढवतात आणि नंतर हल्ला करतात.
इस्रायलच्या मते, भारताने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले तर याचा जागतिक स्तरावर नक्कीच मोठा परिणाम होईल. त्यांनी भारताच्या शेजारी देशांच्या हवाला देत भारताची भूमिका या देशांवर प्रभाव पाडते असे म्हटले आहे. भारताला हमासच्या गुन्ह्यांबद्दल पूर्व माहिती असून भारताने त्यांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलन सतत भारतावर हमासला दहशवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी दबाव आणत राहिल असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
अधिकाऱ्याने म्हटले आहे की, अमेरिकेच्या इस्रायल-हमास युद्धबंदीयोजने नुसार, इस्रायलचे पुढचे पाऊल हमासला संपवणे आहे. सध्या भारताकडून इस्रायलच्या या मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारत इस्रायलची विनंती स्वीकारतो का नाही याकडे लागले आहे.
भारतचा इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार; देशाच्या नौदलात सामील होणार ‘हे’ शक्तिशाली ड्रोन
Ans: इस्रायलने भारताकडे हमास आणि त्यांच्या संबंधित संघटनांवर बंदी घालण्याची आणि त्यांना दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली आहे.
Ans: इस्रायलने यापूर्वी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयाबवर बंदी घालून दहशतवादी घोषित केले होते.






