फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या ग्लोबल साऊथ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात नरेंद्र मोदी 16 ते 21 नोव्हेंबर दरम्यान नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या तीन देशांना भेट देणार आहेत. या तीन देशांच्या दौऱ्यादरम्यान रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरियाला पोहोचले आहेत. ही भेट गेल्या 17 वर्षातमध्ये भारतीय पंतप्रधानांची पहिलीच भेट असून त्यांच्या आगमनानंतर नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांनी मोदींचे अबुजा विमानतळावर जोरदार स्वागत केले.
नायजेरियाचे राष्ट्रपती बोला अहमद टिनुबू यांच्या निमंत्रणावरून ही ऐतिहासिक भेट होत आहे. नायजेरियाचे राष्ट्रपती टिनुबू यांनी विमानतळावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले. तसेच, नायजेरियाच्या फेडरल कॅपिटल टेरिटरीचे मंत्री न्येसोम इझेनवो वाइक यांनी मोदींना अबुजा शहराची प्रतिकात्मक “की टू द सिटी” सादर केली, यामुळे ही भेट अधिक महत्त्वपूर्ण ठरली आहे. ही भेट भारत आणि नायजेरिया यांच्यातील मजबूत आणि वाढत्या संबंधांचे प्रतीक मानली जात आहे.
PM @narendramodi arrives in Abuja, Nigeria.
Warmly welcomed by Minister for Federal Capital Territory Nyesom Ezenwo Wike @GovWike, who presented PM with the ‘Key to the City’ of Abuja.
The key symbolises the trust and honour bestowed on PM by the people of 🇳🇬. pic.twitter.com/9sX9IeGIEq
— Randhir Jaiswal (@MEAIndia) November 16, 2024
या दौऱ्यात नायजेरियातील भारतीय समुदायानेही पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. भारतीय समुदायाचे लोक विमानतळावर मोठ्या संख्येने उपस्थितहोते. त्यांनी विमानतळावर भारतीय तिरंगा फडकावला आणि जल्लोष केला. परराष्ट्र मंत्रालयाने या उत्साहपूर्ण स्वागताचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, हे नायजेरियाच्या लोकांकडून पंतप्रधानांना दिलेला विश्वास आणि आदर दर्शवते.
पंतप्रधान मोदींनी देखील या स्वागतावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “नायजेरियातील भारतीय समुदायाकडून मिळालेले उत्साही आणि हृदयस्पर्शी स्वागत खूप आनंददायी आहे!” या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदी नायजेरियाशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच, दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देतील. 17 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत पंतप्रधान मोदी नायजेरिया, ब्राझील, आणि गयाना या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. नायजेरियातील ही भेट भारत-आफ्रिका संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
Heartwarming to see the Indian community in Nigeria extending such a warm and vibrant welcome! pic.twitter.com/QYfAUOpqRO
— Narendra Modi (@narendramodi) November 16, 2024