Trump Tariffs : 'तर अमेरिका डबघाईला येईल...' US काँग्रेसमध्ये ट्रम्पच्या 50% टॅरिफविरुद्ध बंड; कायदेकर्ते म्हटले भारताशी वैर नको ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US Congress Rebellion Against Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ (America First) धोरणांतर्गत भारतावर लादलेल्या ५० टक्क्यांपर्यंतच्या टॅरिफ (Tariffs) विरोधात अमेरिकेच्या राजकारणात मोठे बंड (Revolt) उभे राहिले आहे. अमेरिकन काँग्रेसमधील (US Congress) कायदेकर्त्यांनी ही करवाढ बेकायदेशीर (Illegal) आणि हानिकारक (Harmful) ठरवत ती रद्द करण्याचा ठराव (Resolution) मांडला आहे.
शुक्रवारी (दि. 12 डिसेंबर 2025) अमेरिकन काँग्रेसमध्ये नॉर्थ कॅरोलिना काँग्रेसवुमन डेबोरा रॉस, मार्क व्हेसी आणि भारतीय-अमेरिकन काँग्रेसमन राजा कृष्णमूर्ती यांनी हा महत्त्वाचा ठराव सादर केला. या ठरावाचा उद्देश ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्यांतर्गत (IEEPA) भारतावर लादलेली राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा (National Emergency) उलथवून टाकणे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Medical Warning : COVID लस ठरली प्राणघातक! FDA लावणार ‘Black Box’ची वॉर्निंग; करोडो तरुणांनी ‘यामुळे’ गमावले प्राण
या शुल्कांचा सर्वात मोठा परिणाम अमेरिकेतील सामान्य ग्राहक आणि व्यवसायांवर होत आहे. या शुल्कांमुळे अनेक भारतीय वंशाच्या उत्पादनांच्या आयात खर्चात (Import Costs) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
US lawmakers Deborah Ross, Marc Veasey, and Raja Krishnamoorthi introduced a resolution to terminate President Donald Trump’s national emergency authorizing tariffs of up to 50 percent on imports from India. Statement: https://t.co/sZ9tw01Hu0 pic.twitter.com/uN8AMMyh2t — Sidhant Sibal (@sidhant) December 13, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : EU Future : अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी प्लॅन’ची कागदपत्रे लीक! जगाला मोठा धक्का; भारत, चीन, रशियाचा ‘Core-5’ सुपरगट बनवणार?
ट्रम्प प्रशासनाने ही अतिरिक्त करवाढ २७ ऑगस्ट २०२५ पासून लागू केली होती. या करवाढीचे मुख्य कारण होते भारताने रशियन तेल खरेदी करणे. ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय धोरणाच्या नावाखाली हे ‘दुय्यम शुल्क’ (Secondary Tariff) लादले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या ठरावाला द्विपक्षीय पाठिंबा (Bipartisan Support) मिळत आहे. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या (Republican Party) अनेक कायदेकर्त्यांनीही या प्रस्तावाला समर्थन दिले आहे. हा प्रस्ताव व्यापार धोरणावर अंतिम निर्णय घेण्याच्या काँग्रेसच्या घटनात्मक अधिकाराला (Constitutional Authority) पुन्हा एकदा पुष्टी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे कायदेकर्त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे कायदेकर्ते आता काँग्रेसमधील या ठरावाद्वारे ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांवर अंकुश लावण्याचा आणि अमेरिका-भारत यांच्यातील मजबूत आर्थिक संबंधांचे (Strong Economic Ties) रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Ans: ५० टक्क्यांपर्यंत (Up to 50%).
Ans: डेबोरा रॉस, मार्क व्हेसी आणि राजा कृष्णमूर्ती.
Ans: भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे.






