रशियाचा युक्रेनवर भीषण हल्ला (फोटो- istockphoto)
युक्रेनचा समूळ नाश करणारच – रशिया
रशियाने कीव वर केला हल्ला
अनेक वर्षांपासून सुरू आहे संघर्ष
World News: गेल्या काही वर्षांपासून रशिया व युक्रेनमध्ये संघर्ष सुरू आहे. अजून किती काळ हा संघर्ष सुरू राहणार याचे उत्तर रशिया व युक्रेनकडे देखील नसल्याचे म्हटले जात आहे. रशियाने अनेक मोठे हल्ले युक्रेनवर केले आहेत. आतासुद्धा रशियाने युक्रेनवर भीषण हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीव शहरावर हल्ला केला आहे. युक्रेनचे यामध्ये मोठे नुकसान झाल्याचे समजते आहे. जगातील अनेक देश या युद्धामुळे चिंतेत आहेत.
रशियाने युक्रेनची राजधानी कीव शहरावर भीषण हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. यामध्ये 9 जण जखमी झाल्याचे समजते आहे. ऊर्जा केंद्रावर रशियाने हल्ला केला आहे. त्यामुळे कीव शहरात अनेक ठिकाणी खूप वीज गेली होती. जखमी झालेल्या लोकांना तातडीने रूग्णालायत दाखल करण्यात आले आहे.
गेले अनेक वर्षांपासून रशिया व युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या हल्ल्यात अनेक इमारतींना आग लागली आहे. तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. युक्रेनदेखील रशियाच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मागील आठवड्यात रशियाने युक्रेनवर भीषण हल्ले सुरू केले आहेत. रशिया युक्रेनच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करत आहे.
At many critical infrastructure sites, recovery efforts continue following Russia’s strike on the energy sector. It was a cynical and calculated attack, with more than 450 drones and over thirty missiles targeting everything that sustains normal life, everything the Russians want… pic.twitter.com/VoGrhhrVaW — Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) October 10, 2025
रशिया युक्रेनच्या ऊर्जा केंद्र आणि रेल्वे मार्गाला लक्ष्य करून अराजकता पसरवण्याचा आणि मानसिक दबाव निर्माण करण्याचा पर्यटन करत आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष म्हणाले आहेत.
रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही
रशियाने युक्रेनच्या उत्तरी भागात म्हणजे सुमी त्या परिसरात मोठा हल्ला केला आहे. रशियाने एका रेल्वेला लक्ष्य केले आहे. रेल्वेवे मोठा हल्ला केला आहे. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीवर बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. रशियाने कीव शहराकडे जाणाऱ्या रेल्वेला लक्ष्य केले आहे.
Russia Ukraine War: महाभयंकर! रशियाने रेल्वे,बस काहीच सोडले नाही! Air Strike करत थेट…; 30 जखमी
रशियाने युक्रेनवर भीषण हल्ला केला आहे. यामध्ये 30 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याचे समोर आले आहे. हल्ला झाल्यावर घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमी लोकांना रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. गेले काही महिन्यांपासून रशिया युक्रेनचे रेल्वे जाळे उध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे.
एक दिवस आधीच रशियाने युक्रेनवर 35 मिसाईल्स आणि 50 ड्रोनने हल्ला केला होता. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बॉम्बवर्षाव करण्यात आला. युक्रेनला पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही असा पवित्रा रशियाने घेतला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा संघर्ष तीव्र होताना दिसून येत आहे.