मॉस्को : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या कार्याचा रशियाने (Russia) गौरव केला. राजधानी मॉस्कोमध्ये (Moscow) अण्णाभाऊंचा पुतळा, तैलचित्र उभारण्यात आले आहे. यांचे अनावरण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रशियात भारतीय संस्कृती (Indian Culture) जपल्याचा गर्व वाटत आहे. जे वंचितांचे आवाज होते. ज्यांना आयुष्यात एकदाच शाळेत जाण्याचा अनुभव होता. २२७ किमी चालून तो व्यक्ति पुण्यात आला. शिक्षण नसतानाही पुस्तके, कथा, पोवाडे लिहिले. सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी प्रयत्न केले. भारतीय स्वतंत्रता संग्रामासह गोव्याच्या मुक्ती संग्रामामध्ये ज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांचा आज रशियाने गौरव केला याचा मला गर्व वाटतो, असे ते म्हणाले.
LIVE | Unveiling Ceremony of Social Reformer Anna Bhau Sathe Statue | Moscow https://t.co/0koddpB7jM
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2022
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या कर्तृत्वाचा आणि भारत-रशिया संबंधांच्या दृढीकरणाचा हेतू आहे. त्या अनुषंगाने अण्णा भाऊंनी केलेल्या महान कार्याला सलामी म्हणून मॉस्को येथील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर या प्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने अर्धाकृती पुतळा आंतरराष्ट्रीय विभूतींच्यासोबत बसविला आहे. या पुतळ्याचे व तैलचित्राचे आज अनावरण करण्यात आले आहे. रशियाच्या मॉस्कोमध्ये डिप्लोमॅटिक रिलेशन्सन इन आर्ट कल्चर अँड लिटरेचर येथे आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली.