रशिया-भारत व्यापाराने मोडले विक्रम! गेल्या चार वर्षात ५ पटीने वाढ; एस. जयशंकर यांना मांडला पुढील आराखडा(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India Russia Trade Relations : नवी दिल्ली/ मॉस्को : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. सध्या ते मॉस्कोमध्ये २६ व्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या (IRIGC-TEC) बैठकीसाठीत सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी रशियाचे समकक्ष आणि उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह याच्यासोबत सह-अध्यक्षपद भूषवले.
या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियातील (India Russia Relations) व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक भागीदारीवर चर्चा करण्यात आली. तसेच दोन्ही देशांमध्ये शेती, उर्जा, उद्योग, कौशल्य विकास, गतिशीलता, शिक्षण आणि संस्कृती यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये संबंध वाढवण्यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांनी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली.
भारताविरोधात आंतरराष्ट्रीय कट? ट्रम्पच्या मदतीने बांगलादेशला ‘पूर्व पाकिस्तान’ बनवण्याची तयारी
यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बैठकीची माहिती एक्सवर शेअर केली. त्यांनी सांगितले की, सध्या जगातील परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे. अशा परिस्थितीत रशिया आणि भारताची भेट होत आहे. जयशंकर यांनी IRIGIC-TEC ला अधिक मजबूत करण्यासाठी काही उपयोजना शेअर केले आहे. यामुळे भारत आणि रशियामधील संबंधामध्ये अधिक बळकटी येईल आणि यामुळे गतीही वाढले. भारत आणि रशिया एक मजबूत भागीदार बनतील. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की,
या सुचना एस. जयशंकर यांनी दिल्या आहेत.
Co-chaired an extremely productive 26th India-Russia Inter-Governmental Commission on Trade, Economic, Scientific, Technological and Cultural Cooperation IRIGC-TEC along with First DPM Denis Manturov of Russia today.
We had detailed discussions on our cooperation in a… pic.twitter.com/fJHqjjloY4
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) August 20, 2025
एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये भारत आणि रशियामध्ये द्विपक्षीय व्यापारा १३ अब्ज अमेरिकन डॉलर्स होता. २०२४-२५ मध्ये दोन्ही देशाच्या व्यापारत ६८ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ झाली. यानंतरी यामध्ये चार ते पाचपटीपर्यंत वाढ झाली आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारादरम्यान अनेक अडथळे आले.
तसेच दोन्ही देशांमध्ये व्यापार तूटीतही वाढ झाली आहे. २०२१ मध्ये ६.६ अब्ज डॉलर्सची तूट होती, जी नऊपटीने वाढून ५८.९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. यामुळे जयशंकर यांनी दोन्ही देशांमधील व्यापार तुट भरुन काढण्यावर आणि व्यापार अधिक मजबूत करण्यावर लक्ष्य देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक